महाराष्ट्रमुख्यपान
एका शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यासह कोतवालाला अटक.

वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार वडिलोपार्जित शेतीच्या सातबारावर फेरफार नोंद करून नाव समाविष्ट करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यासह कोतवालाला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी मौदा तालुक्यातील चाचेर तलाठी कार्यालयात केली. आरोपी सुनीता नेमीचंद घाटे (५४, रा. संमती भवन, जैन मंदिराजवळ, इतवारी, नागपूर) असे लाचखोर तलाठी तर किशोर किसन वानखेडे (५४, वार्ड क्रमांक ४, चाचेर) असे आरोपी कोतवालाचे नाव आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत