मनुवाद एक भयानक मानसिक रोग– अशोक सवाई.

(एक भयंकर रोग)
मनुवाद हा एक भयंकर मानसिक रोग आहे. बरं हा साधासुधा रोग नसून संसर्गजन्य रोग आहे. या रोगाच्या प्रभाव क्षेत्रात कुणी साधा भोळा माणूस गेला की, त्याला लगेच या रोगाची बाधा होते. गेले तीन हजार वर्षांपूर्वी पासून या रोगाने भारतीय जनतेला पछाडले, छळले, मानसिक रोगी केले आहे. जे मनुवादी अंधभक्त हा रोग पसरवतात त्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न २०१४ पासून सत्तेवर असलेल्या सत्तेने कधीही केला नाही. असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. अंधभक्तांवर काही इलाज न करता किंवा मौन बाळगून उलट एकप्रकारे त्यांना अप्रत्यक्षरित्या सत्ता प्रोत्साहन देत आहे की काय असी शंका आल्यावाचून राहत नाही. याच वर्षी २०२५ ला रां. स्व. संघाची शताब्दी नुकतीच पूर्ण झाली. म्हणून की काय त्यांच्या व त्यांचेच अपत्य असलेल्या बीजेपी अंधभक्तांना फारच उन्माद चढला असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. जसे पाण्याचे तापमान 100° C पर्यंत वाढले की त्याला उत्कलनबिंदू प्राप्त होतो तसेच संघाची शताब्दी पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या व भाजप भक्तांच्या उन्मादाने उन्मादी उत्कलनबिंदू गाठला असेच वाटते. आणि त्याचे तापमान 100° C पर्यंत वाढवत नेले ते अप्रत्यक्षरित्या भाजपच्या सत्तेने म्हणजेच अंधभक्ताचा उन्माद संघाच्या शताब्दी पर्यंत वाढवत नेला की काय? वेळीच संविधानिक पध्दतीने त्यांच्या वर देशहितासाठी काहीही कारवाई झाली नाही ही खेदाची बाब आहे. २०१४ पासून देशात अशा अनेक घटना घडल्या की मानवी मुल्यांची उघड उघड व अतोनात पायमल्ली झाली. मग त्यामध्ये महिला अत्याचार असो, मागासवर्गीय समाजाला विना कारण शारीरिक/मानसिक त्रास देणे किंवा जीव घेणे असो, अल्पसंख्याकांचे माॅबलिंचींग असो, देशाचा शेतकरी, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी वर्ग (पेपर फुटी प्रकरण) अशा अनेक घटना आहेत ज्या सर्व सामान्य जनतेशी निगडित आहेत. ज्या बीजेपी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेला त्राहिमाम करत आहेत. त्यामुळे साऱ्या जगात सरकारची बेइज्जती झाली आहे व होत आहे. भाजप सरकारचे अंधभक्त नेहमी संविधान खतम करून हिंदू राष्ट्र बनवण्याची अघोरी भाषा वापरतात. त्यांना सांगावेसे वाटते की पहिले आपल्या पक्षाच्या नावातील भारतीय हा संविधानिक शब्द तर हटवून दाखवा. त्याऐवजी ‘हिंदू राष्ट्र’ जनता पार्टी असे पार्टीचे नामकरण किंवा नामांतर करा नंतर हिंदू राष्ट्राचे स्वप्न बघा. भक्त देशातील लोकांना हिंदू म्हणतात मग हिंदूंचीच गळचेपी करून हिंदू राष्ट्र कसे होईल राजेहो?
मनुवादी रोगाचा परमोच्च बिंदू म्हणजे देशाच्या राजधानीत कालपरवा देशाचा घोर अपमान करणारी, शरम आणणारी घटना घडली. ती म्हणजे भर सर्वोच्च न्यायालयत मा. सरन्यायाधीशांच्या दिशेने कोणत्या तरी स्वतःला वकील म्हणवणाऱ्या मनुवादी रोगी माथेफिरूने पायातील जोडा फेकला. त्यावर उत आलेली भक्तमंडळी एखाद्या उत्सवा सारखी समाज माध्यमातून काय काय लिहू लागली, बरळू लागली? मा. सर न्यायाधीशानांच ट्रोल करू लागली. हे तर ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशीच गोष्ट झाली. देशातील सूज्ञ नागरिकां पासून जगाने ही त्या सर्व घटना पाहिल्या. हा यांचा राष्ट्रवाद. देशाचे मा. सरन्यायाधीश बी. आर. गवई हे अनुसूचित जातीतील (मी इथे त्यांच्यासाठी दलित हा शब्द वापरणार नाही कारण हा शब्द असंविधानिक आहे) बौद्ध धम्मीय आहेत. म्हणून भक्तमंडळी एक प्रकारचा उत्सव साजरा करीत आहेत काय? प्रश्न पडतो. ज्या मनुवादी विकृत प्रवृत्तीने माता सावित्रीबाई यांच्यावर शेण/चिखलाचे गोळे फेकले होते तीच विकृत प्रवृत्ती आजही जिवंत आहे. या ‘जोडाफेक’ प्रकरणाने सर्वात मोठा अपमान घटनेचा व घटनाकारांचा झाला. देशातील सर्व संविधानिक न्याय संस्था त्या संस्थेचे सर्व न्यायाधीशां सहित इतरही संस्थांचा व अंधभक्त सोडून इतर सर्व नागरिकांचा पर्यायी देशाचा घोर अपमान झाला आहे. असा अपमान करणारे देशद्रोह्यांच्या श्रेणीत येतात. कारण देशाचे सरन्यायाधीश अंधभक्त सोडून साऱ्या जनतेचे सर न्यायाधीश असतातत. मनुवादी मनोरुग्ण वकीलाला कोर्टातील सुरक्षा रक्षकांनी जेव्हा पकडले तेव्हा तो ‘सनातन का अपमान नही सहेंगे’ अशी घोषणा देत, बोंबलत बाहेर गेला. *सनातन हा शब्द सुद्धा बुद्ध धम्मातून आलेला आहे. एसो धम्मो सन्नंतनो* हे विदेशी लोक (मायकेल बामशाद यांच्या डीएनए रिपोर्ट प्रमाणे) भारतात आले तेव्हा ते आर्य होते नंतर वैदिक झाले नंतर ब्राह्मण झाले नंतर हिंदू झाले. पण हाही शब्द परकीय आक्रमण कर्ते मुसलमानांनी दिला हे लक्षात आल्यावर यांची चांगलीच गोची झाली. म्हणून आता हिंदू शब्दाला बाजूला सारून ‘सनातन’ म्हणू लागले. सनातन शब्द बौद्ध धम्माचा असल्याने एक प्रकारे म्हणता येइल की ते शेवटी बौद्ध धम्माला शरण गेले. असा या बहुरूपींचा त्यांच्या धर्माबाबतचा प्रवास आहे. सनातन म्हणजे अनंत (ज्याला अंत नाही) काळासाठी असलेला. हा जोडा फेकणारा असो किंवा ग्वाल्हेर कोर्टातील बाबासाहेबांच्या मुर्तीला विरोध करणारा असो. दोघेही किंवा अजून कुणीही असेल हे डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच वकिल झालेत ना? तरी ते आजही बाबासाहेबाना विरोध करतात म्हणजे ते मनुवादी मानसिक रोगी आहेत हे तपासण्यासाठी कुण्या मनोरुग्ण तज्ञांची गरज नाही.
या मनुवादी मनोरुग्ण लोकांची देवादिकांवर श्रद्धा असणे किंवा त्यापायी त्यांच्या भावना दुखावल्या जाणे हे त्यांचे दुखणे नाही साहेब… त्यांचे दुखणे हे आहे की, ज्यांच्या कमरेला आम्ही झाडू लटकवला गळ्यात गाडगे अडकवले त्यांच्याच एका महाराच्या पोराने देशाची घटना लिहली. आणि आता त्याच घटनेच्या अधीन राहून आम्हाला नाक घासत जगावे लागते हे त्यांचे खरे दुखणे आहे हुजूर… याला इतिहास साक्षीदार आहे. आणि तोच एक महाराचा पोरगा सरन्यायाधीश होवून आम्हाला आदेश देतो म्हणजे काय? एवढी बिशाद? तोबा तोबा हे तर अती झालं हो… यामुळे तर आमची तळपायाची आग मस्तकात गेली. आणि ती मस्तकात गेली म्हणूनच आम्ही सरन्यायाधीश यांचा चेहरा विकृतपणे नीळा करून त्यांच्या गळ्यात गाडगे लटकवल्याचा विकृत फोटो आम्ही सोशल मीडियावर व्हायरल केला. हा मनुवादी मानसिक रोग्यांचा किती नीचपणा? सरन्यायाधीश जर ब्राह्मण जातीतील असते किंवा बूट फेकणारा कुणी अल्पसंख्याक किंवा इतर जातीचा असता तर हेच भडमभुंजे संविधानाचा व देशाचा अपमान झाला म्हणून साऱ्या देशभर हिंडत बोंबलत फिरले असते. आणि त्याला लगेच देशद्रोही ठरवून देशद्रोहाचे कलम लावून तुरुंगात सडवले असते. बरं बूट फेकणाऱ्याला सर न्याधीशांनी माफ केल्यावर सुद्धा त्या बूट फेकणाऱ्याला आपल्या अघोरी कृत्याची लाज/शरम/खंत तर नाहीच उलट तो गोदी मिडियावर बोंबलत सुटला माफी मागणार नही, सनातन धर्माचा अपमान वगैरे बरळत सुटला. केवढा हा कोडगेपणा/नीच पणा? आणि त्याने रणभूमीवर शुरवीरा सारखा एखादा पराक्रम गाजवला अशा थाटात त्याला आपापल्या चॅनेलवर मुलाखतीसाठी गोदी मिडिया मध्ये होड लागली आहे. आपल्या पायात घुंगरू बांधून मुजरा करत घुंगरांच्या छनछनाटात ता… था… थैय्या… करत जोडा फेकणाऱ्याची मुलाखती घेत होती/घेत आह हीच गोदी मिडिया. बस एवढीच यांची पत्रकारिता. यांच्या पत्रकारितेची जगात कितीतरी वेळा नाचक्की झाली तरी यांनी लाजा, शरमा नावाची चीज बाकी ठेवली नाही.
बूट फेकणाऱ्याला मा. सर न्यायाधीशांनी जरी माफ केले असले तरी त्यांच्या सन्मानित पदाची खुर्ची त्यांचा झालेला अपमान सहन करणार नाही. म्हणूनच जनता आक्रोशित होवून संविधान, संविधान निर्माते आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या समर्थनार्थ रोज सडकेवर उतरत आहे. यात सर्व धर्माचे व जातीचे लोक सामील आहेत. यात ब्राह्मण सुद्धा आहेत. जसे काही भटाळलेले बहुजन आहेत. तसेच संविधानाचे समर्थन करणारे, संविधानाला मानणारे ब्राह्मण सुद्धा आहेत. त्यामुळे सरसकट सर्वच ब्राह्मण संविधान विरोधी आहेत असे म्हणता येणार नाही. संविधान विरोधी विकृती ही २०१४ पासून जरा जास्तच वाढली. जगाच्या नकाशावरील जशी जशी जगातील देशांची ओळख झाली. तसे तसे कोणत्याही देशाचे नागरिक इतर कोणत्याही देशात स्थलांतरित होत गेले. स्थलांतरित झालेल्यांनी त्या त्या देशाचे कायमस्वरूपी नागरिकत्व पत्करले. त्या त्या देशातील घटना, कायदे कानून स्विकारले. त्या देशाच्या संस्कृतीशी एकरूप झाले. त्या देशाच्या प्रगतीत स्थलांतरितांचे ही मोठे योगदान असते. तसेच इथले कर्मठ ब्राह्मण सुद्धा इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या सभ्यतेशी, इथल्या संविधानाशी, देशाच्या प्रतीकांशी जर एकरूप झाले असते. तर इथल्या भूमिपुत्रांनी त्यांना केव्हाच स्विकारले असते. जसे इतर देशांनी इतर देशाच्या नागरिकांना स्विकरले तसेच इथेही घडले असते. पण तसे घडताना दिसत नाही. हे कर्मठ ब्राह्मणांचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. भारतीय समाजाला माझी एक विनंती आहे. मायबापहो आर. एस. एस. व बीजेपी अंधभक्तांपासन कोसो दूर राहा. आपल्या मुलाबाळांना. आप्तेष्टांना, मित्रंडळींनाही दूर राहायला सांगा तेही अतिशय आग्रहाने. कारण आर एस एस चा चेहरा दिसतो त्यापेक्षा कैक पटीने भयानक/भयावह आहे. माझा हा सल्ला गांठ बांधून ठेवा. शेवटी हा देश आपला आहे आणि आम्हाला आमचा देश प्यारा आहे साहेब…
– अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत