मुंबई :मध्य रेल्वेवरील ‘मेगाब्लॉक’ रद्द.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने जाहीर केला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन आणि सीएसएमटी ते वाशी, पनवेल, बेलापूर अप आणि डाऊन मार्गावर, सीएसएमटी ते गोरेगाव, वांद्रे मार्गावर आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, दिवाळीनिमित्त हा ब्लॉक रद्द केला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत