पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर

पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांना नऊ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता दिली असून, यापैकी दोन लाख ७२ हजार ९१६ सौर पंप बसवण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ७१ हजार ९५८ सौर पंप बसवण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून ‘किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ म्हणजेच ‘कुसुम’ ही योजना २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी राबवली जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं, यासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जातो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत