
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनावर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. ही योजना नक्की काय आहे या विषयी आपण जाणून घेऊया..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी २०१७ रोजी ही योजना देशातील सर्व जिल्ह्यामधे लागू केली गेली. गरोदरपणात महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने हे पाऊल उचलेले गेले. गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ होते. माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली. यापूर्वी या योजनेतून दोन मुलासाठी लाभ देण्यात येतो. पहिल्या मुलासाठी ५ हजार रुपये दोन टप्प्यात तर दुसरे मुल हे मुलगी असल्यास एकत्रितपणे ६ हजार रुपये लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३.५२ कोटींहून जास्त मातांनी नावनोंदणी केली आहे आणि ३.११ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळाले आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनाचा लाभ मिळण्यासाठी महिलेचे कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच लाभ घेण्यासाठी महिला ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, ४० टक्के व अधिक अपंगत्व असणारी दिव्यांग, बीपीएल शिधापत्रिकाधारक, आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी, ई-श्रम कार्ड धारक, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकरी, मनरेगा जॉब कार्डधारक, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस /आशा कार्यकर्ती यापैकी किमान एका गटातील असणे आवश्यक आहे. तसेच या महिलेने किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थीचे वय किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्ष दरम्यान असावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत