महाराष्ट्रराजकीय

नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पदयात्रेला सुरवात

अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पदयात्रेला सुरवात झाली आहे. अमरावतीत राणा दाम्पत्याची अनवायी पायाने पदयात्रा करत आहेत.  विदर्भाच कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्याची पदयात्रा करत आहेत.  गंगा -सावित्री निवासस्थाना पासून 2 किलोमीटरच्या अंबादेवी पर्यंत पदयात्रा सुरु आहे.  अंबादेवीची राणा दाम्पत्य महाआरती करणार आहेत.  अंबादेवीला साकडंही घालणार आहेत.

राणा दाम्पत्याच्या कोर्टात गैरहजेरीची न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली. संसदेचं अधिवेशन सुरु असल्यामुळं खासदार नवनीत राणा यांची गैरहजेरी समजू शकतो, पण आमदार रवी राणा गैरहजर का? असा सवाल यावेळी कोर्टानं विचारला.

विशेष म्हणजे राणा यांचे वकील रिझवान मर्चंट कोर्टात गैरहजर, सरकारी वकील सुमेर पंजवानी गैरहजर, केस तपासाधिकारी सुट्टीवर असल्यानं कोणीच कोर्टात हजर नव्हते. यामुळं कोर्ट भडकलं आणि न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, अशा शब्दांत कोर्टानं या सर्वांना झापलं. नवनीत आणी रवी राणा यांना कोर्टानं दिली अखेरची संधी. दोघांनाही 28 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. सरकारी पक्षाकडून सुरु असलेल्या चाल ढकलीचीही कोर्टानं यावेळी विशेष नोंद घेतली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!