भारत

चेन चोरून पब्लिक टॉयलेटमध्ये घुसला, पण तिथून गायबच झाला.. सराईत चोराने कसा दिला गुंगारा ?

 एखादा चोर किंवा गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कधी ना कधी सापडतोच. मात्र काहीवेळा गुन्हेगार असं डोकं लढवतात, की त्यामुळे थोड्या वेळासाठी पोलिसही चक्रावू शकतात. गुन्हा करून सराईतपणे ते गुंगारा देतात. अशीच एक घटना मुंबईतही (crime in mumbai) घडली. त्यामध्ये एका चेन स्नॅचरने त्याच्याच सहकारी महिलेची चेन पळवली आणि तो तेथून पब्लिक टॉयलेटमध्ये गेला आणि गायबच झाला. तिथून त्याचा काही मागच लागला नाही, सीसीटीव्हीमध्ये देखील तो दिसला नाही.

चेन स्नॅचिंगची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले मात्र त्या चोराचा कुठेच पत्ता लागला नाही, जणू तो हवेच गायबच झाला असावा. त्याचा कारमाना पाहून पोलिसही थक्क झाले. चोरी करून गायब झालेल्या त्या साईत चोराने असा गुंगारा दिला, ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. मात्र अखेर त्याच्या या कृतीमागचे रहस्य उलगडले आणि पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले. चोरीनंतरची गायब होण्याची त्याची क्लुप्ती पाहून पोलिसही काही वेळासाठी चक्रावले हेच खरं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!