एक वही… एक पेन अभियान!

(झोळीमुक्त, भिक्षामुक्त समाज निर्मिती)
भीक नको… वही, पुस्तक द्या…
डॉ.कालिदास शिंदे यांच्या
संकल्पनेतून या देशातील पहिल्या अनोख्या अभियानाची सुरुवात दिघंची गावात झाली. सामाजिक कार्यकर्ते, सर्व क्षेत्रांतील मान्यवर यांचे कडून करण्यात आलेल्या तुटपुंज्या मदतीत
शिक्षणापासून वंचित, मागास, दुर्लक्षित, उपेक्षित, जे-जे गरजू बालक-एकले. अनाथ, आधारहीन, आई-वडील नसलेले, सर्व समाज घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, पालावर भटकंती करणारे बालक, भिक्षेकरी भटक्या जमाती मधील भिक्षा मागायला जाणारे बालक, स्थलांतरित, बांधकाम मजूर, कामगार, श्रमिक, गरीब, बेरोजगार इ. समाज घटकातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून Dighanchi येथील भिक्षेकरी भटक्या जमाती मधील 15 मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप ग्रामस्थ व सामाजिक विचारवंत यांचे हस्ते करण्यात आले यात अमोल मोरे सरपंच , जे माने मुख्याध्यापक , दिघंची हायस्कूल दिघंची, जावीर सर, केंगार सर, जाधव सर, देविदास शिंदे, आदिनाथ अंकुश महाराज, पिंटू भाळवणकर, मुजु तांबोळी, व्ही एन. देशमुख सर, गोंजारी सर, शिरकांडे सर,अंकुश मुढे, बालाजी रणदिवे, बाबा वाघमारे, संग्राम मोरे इ. मान्यवर यांची उपस्थीती लाभली.
डॉ. कालिदास शिंदे (झोळी)
एमए, एम.एस.डब्ल्यू, एम.फिल (टीआयएसएस), पीएचडी (टीआयएसएस)
9823985351
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत