दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग येथील डॉ जे बी वडणे जेष्ठ पत्रकार विलास येडगे यांना “आम्मा पुरस्काराने ” करण्यात आले सन्मानीत

नळदुर्ग येथील कै यमुनाबाई रंगराव अंहकारी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथील कै.यमुनाबाई रंगराव अहंकारी प्रतिष्ठानच्या वतीने नळदुर्गचे माजी नगरसेवक व ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अंहकारी यांच्या आयोजित “आम्मा पुरस्कार ” सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न करण्यात आला
माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आपल्या मातोश्री कै.यमुनाबाई रंगराव अहंकारी यांच्या आठवणी जाग्या आसाव्यात म्हणून आईच्या ५ व्या पुण्यतिथी निमित्त आईच्या नावाने “आम्मा पुरस्कार ” सुरु करण्यात आलेला आहे..
यावर्षी हा पुरस्कार नळदुर्ग येथील सेवानिवृत्त अतीरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.जे. बी वडणे यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेचे ५० वर्ष पूर्ण झाले शिवाय नळदुर्ग शहरातील ते ऐकमेव डॉक्टर आहेत ते २४ तास निस्वार्थ सेवा करतात ते गोर गरीब जनतेला उत्तम सेवा देतात म्हणून त्यांना “आम्मा पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले शिवाय दुसरे पुरस्काराचे मानकरी नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार विलास रामराव येडगे यांना त्यांच्या पत्रकारिता सेवेला ३५ वर्ष पूर्ण झाले लिखानाचा छंद निर्भिड लेखणी उज्वल भविष्यासाठी तरुणाना मार्गदर्शन नळदुर्ग शहराच्या विकासासाठी विविध प्रकारची निस्वार्थ लेखणी करून विकासात योगदान दिले आहे पत्रकाराच्या विविध मागण्यासाठीअनेक आंदोलने उपोषणे केली नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी अंदोलने केले जेल ही भोगले पत्रकार विलास येडगे याना इतिहास आहे म्हणून त्यांना आम्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, माजी नगरध्यक्ष नितीन कासार, माजी उपनराध्यक्ष शफिभाई शेख, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक बसवराज धरणे, ब्राह्मण समाज संघटनेचे सचिव मुकुंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते अझहर जगीरदार, शिवसेनेचे सरदारसिंह ठाकूर, भाजपाचे माजी अध्यक्ष धिमाजी घुगे,पद्माकर घोडके,सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे,आंबाबाई देवस्थानचे अध्यक्ष रमेश जाधव, युवा उद्योजक समीर मोरे..जेष्ठ नागरिक बाळासाहेब कुलकर्णी, वसंतराव अहंकारी, बाबुराव वैद्य, अशोकराव केसकर, वसंतराव रामदासी, उत्तमराव रामदासी, सुधीर पुराणिक, मुकुंद भूमकर, तानाजी नागणे,पत्रकार उत्तम बनसगोळे, पत्रकार तानाजी जाधव, पत्रकार दादासाहेब बनसोडे, राजेंद्र महाबोले, सतीश जाधव, अमर भाळे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्यासोबत सचिन भूमकर,ज्ञानेश्वर केसकर,अजय देशपांडे,दिशा ब्यांकेचे व्यवस्थापक उमेश जाधव, प्रदीप ग्रामोपाध्याय,सन्नी भूमकर, उमेश नाईक,संतोष नाईक,सदानंद नाईक,हालीम पटेल,बंडाप्पा कसेकर. सौरभ रामदासी,प्रसन्ना कुलकर्णी,गणेश मोरडे, सुनिल गव्हाणे,अनिल पाटील, महेश कोप्पा,सुनिल गव्हाणे, विजय ठाकूर रोहित वाले.यांनी यांनी प्रयत्न केले..
मान्यवरांच्या हस्ते आम्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला..
याप्रसंगी तानाजी जाधव,मुकुंद नाईक, कमलाकर चव्हाण, शहबाज काझी, शफिभाई शेख, डॉ. वडणे यांनी आपल्या मनोगतातून विनायक अहंकारी यांच्या कार्याचे कौतुक केले..
शेवटी विनायक अहंकारी यांनी सर्वांचे आभार मानले .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!