‘विधवा केशवपन’ – प्रथा कुणी सुरू केली आणि कुणी मोडली? ब्राह्मण महासंघ व हिंदू महासंघ उत्तर देणार का?

समाज माध्यमातून साभार
ब्राह्मण समाजातील पाखंडी परंपरांचा आणि स्त्रीविरोधी चालीरीतींचा पर्दाफाश करताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर झगडा केला. यातील एक क्रूरतम प्रथा म्हणजे ‘विधवा केशवपन’. नवऱ्याच्या मृत्यूनंतर विधवेचे केस जबरदस्तीने हळदीच्या पाण्याने भिजवून, धारदार वस्तर्याने भादरून काढले जात. केसांबरोबर तिचा आत्मसन्मान, स्वातंत्र्य, आणि आयुष्य जगण्याचा हक्क यांनाही गाडले जाई.
हा क्रूर प्रकार कोणी सुरू केला? याचे उत्तर द्यायला आजही समाजात टाळाटाळ केली जाते. परंतु इतिहासाच्या पानांमध्ये हे स्पष्ट आहे ही प्रथा ब्राह्मणसंस्कृतीने आणि त्याच्या धर्मशास्त्रांनी रूढ केली. विधवांच्या आयुष्यावर बंदी घालणारे नियम मनूस्मृतीसारख्या धर्मग्रंथांतून आले. तिचं आयुष्य केवळ काळोखात लोटणं हा उद्देश होता.
मात्र ही प्रथा मोडली कुणी? तिच्याविरोधात उभं ठाकलं कुणी?
महात्मा फुले! — ज्यांनी केवळ लेखन आणि विचारांतूनच नव्हे, तर थेट कृतीतून या अमानुष प्रथेचा मुकाबला केला. त्यांनी नाभिक समाजाला संघटित केलं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं — “जर एखाद्या विधवेचे केस तुम्ही कापले, तर आम्ही तुम्हाला बहिष्कृत करू.” परिणामी नाभिकांचा संघटित संप झाला. कोणत्याही विधवेचे केस कापने थांबलं. आणि ती क्रूर प्रथा नष्ट झाली.
म्हणजे काय? ही प्रथा ब्राह्मणांनी सुरू केली आणि ती मोडली महात्मा फुल्यांनी!
चित्रपटावर आक्षेप घेणारी ब्राह्मण महासंघाची भगिनी आज शेंडी आणि जानवे यांना त्यांच्या अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानते.
या ब्राह्मण भगिनीने हे कधीही विसरू नये, की हेच शेंडी आणि जानवे परंपरेच्या नावाखाली तिला विधवा झाल्यावर टकलं करून अंधाऱ्या खोलीत डांबायची परवानगी दयायचे. तिचं सामान्य आयुष्य जगणं, फिरणं, बोलणं – सगळ्यावर बंदी घालायचे.
हीच शेंडी जाणव्याची अस्मिता आणि स्वाभिमान.. तिच्या अस्तित्वावरच अन्याय करत होती.
आज ब्राह्मण महासंघ महिला सबलीकरणाच्या गप्पा मारतो, पण स्वतःच्या समाजातील या क्रूरतेच्या इतिहासावर मौन बाळगतो. का? त्या प्रथेचं समर्थन करताय का? की इतिहासाची जबाबदारी घ्यायला घाबरताय?
जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर या प्रश्नाला सामोरं जा —
‘विधवा केशवपन’ ही प्रथा ब्राह्मणांनी सुरू केली होती का नाही? उत्तर द्या!
आणि समाजानेही हे समजून घ्यावं की, कोण प्रथा बनवतं, आणि कोण मोडतं — याचे उत्तर इतिहासात स्पष्ट लिहिले आहे. आता वेळ आहे हे पुन्हा दाखवण्याची!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत