तुमच्या मुलांना मतीमंद बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे…!!!

देशातील बहुसंख्य जनतेला म्हणजेच ८५% जनतेला मेंदूच्या विकासा पासुन वंचित ठेऊन मुठभर लोकांच्या वर्चस्वा साठी शिक्षणा सारख्या क्षेत्रात झपाट्याने बदल करीत येणाऱ्या पिढ्यांना मतीमंद बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे…!!
जे पालक आहेत त्यांनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा हिंदू राष्ट्राच्या नशेत तुमची मुलं जगाच्या स्पर्धेतून बाद झालेली असतील.आणि त्यापुढची पिढी गुलाम झालेली असेल…!!
जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जगातील प्रगत राष्ट्राची बरोबरी करण्यासाठी, शिक्षण दर्जेदार तथा जागतिक विषयांशी निगडित असले पाहिजे हा निकष आहे...!!
म्हणून इतिहास, विज्ञान, हे विषय नव्या पिढीला जगातील इतर राष्ट्राशी तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करून काय करावे म्हणजे प्रगती कडे जाता येईल हा धडा देतात...!!
प्रत्येक देश इतर देशांचा, इतर खंडाचा इतिहास अभ्यासुन आपल्या प्रगतीचा आराखडा आखतो...!!
विज्ञानाच्या अभ्यासामुळे तर जग जवळ आले आहे, आणि जगणे सुखकर झाले आहे…!!
अशा प्रगत काळात भारतात मात्र शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होतं आहे आणि हा अतिशय चिंतेचा विषय आहे…!!
एनसीईआरटी च्या अभ्यासक्रमात बदल करीत इतिहास विषयामध्ये मुघलांचा इतिहास गाडून नव्याने काही प्रकरणं जोडून इतिहास विषयाला विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या देशाचा इतिहास माहित नसेल आणि जो काही इतिहास शिकवला तो चुकीचा आणि एका विशिष्ट जातीचे उन्नयन करणारा असेल तर तुमची पुढची पिढी मतीमंद आहे हेच सिद्ध होईल...!!
एनसीईआरटी च्या विज्ञान विषयाच्या पुस्तकातून डार्विनचा विकास वादाचा सिद्धांत हटविण्याचे शासनाने ठरविले आहे. ही सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे…!!
विज्ञान हा विषय जागतिक पातळीवर शिकला आणि शिकवला जातो. जगातील इतर विद्यार्थी डार्विनचा विकास वादाचा सिद्धांत समजून घेतील मात्र भारतीय विद्यार्थी त्या सत्यापासून अनभिज्ञ असेल याचा अर्थ असा की, जगाच्या तुलनेत भारतीय तरुण हा मतीमंद ठरेल…!!
एनसीईआरटी च्या विज्ञानाच्या पुस्तकातील या बदलाच्या विरोधात देशभरातील १८५ शास्त्रज्ञांनी सरकारकडे सह्या करुन विरोध नोंदविला आहे.शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की,डार्विनचा सिद्धांत गाडून तुम्ही विज्ञानाच्या मौलिक सिद्धांताचा गळा घोटतं आहात.आणि येणाऱ्या पिढ्यांना अंधकाराच्या खाईत ढकलतं आहात…!!
शिक्षणातून इतिहास, आणि विज्ञाना सारखे विषयात बदल करून शासनकर्ते काय साध्य करु इच्छितात…??
हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा समजून त्याचे उत्तर मिळविले पाहिजे म्हणजे शासनकर्त्यांचा मनसुबा समजून घ्यायला मदत होईल…!!
ज्यांना, ज्यांना भारताच्या इतिहासाचा अभ्यास आहे त्या सर्वांना माहीत आहे की,हजारो वर्षे इथल्या मुठभर विकृत मानसिकतेच्या वर्ण वर्चस्ववादी लोकांनी बहुसंख्य जनतेला गुलाम म्हणून वागविले…!!
देशातील सर्वात मोठ्या वर्गाला म्हणजेच आजच्या ओबीसी बांधवांना शुद्र बनवून त्याला सेवेकरी म्हणून राबवून घेतले,त्याला संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता....!!
अनुसूचित जातीचे समाजातील जे बंडखोर होते त्यांना अस्पृश्य बनविले, गावकुसाच्या बाहेर हाकलले, आणि विरोध मोडून काढला...!!
समाजातील जे आक्रमक वृत्तीचे होते त्यांना गुन्हेगार जमाती ठरवून भटक्या विमुक्तांना लपून छपून रहायला आणि द-या खो-यात जगायला भाग पाडले….!!
भारतीय समाजाचे असे तुकडे, तुकडे करून मुठभर वर्ण वर्चस्ववादी लोकांनी हजारो वर्षे राज्य गाजविले आहे,त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी शिक्षणात बदल करून जुनी वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था लागू करायची आहे. त्यासाठी हा आटापिटा चालला आहे...!!
भारतीय पालकांनो वेळीच सावध व्हा,तुम्हाला हिंदुत्वाच्या नशेचा डोज दिला आहे,त्यामधून बाहेर पडा,नाहीतर तुमच्या पुढच्या पिढ्या गुलाम बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे...!!
तुमच्या मुलींना शिकविण्यासाठी सावित्रीबाई फुल्यांनी किती कष्ट घेतले ते एकदा आठवा, तेच शिक्षण नासविले जाते आहे.तुमच्या मुलांना ज्ञान नाही तर अज्ञानाकडे ढकलले जाते आहे…!!
तुमच्या सर्वनाशाचे कारण सांगतांना म. फूले म्हणाले होते, या सर्व अनर्थाचे मुळ ” अज्ञान ” आहे…!!
आजचे शासनकर्ते तुमच्या मुलांना अज्ञानाकडे ढकलू लागले आहेत, सावधान…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत