नळदुर्ग येथील प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे हिस राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा उपक्रम
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथे जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग येथील इयता १० वीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविलेली विद्यार्थीनीं प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे हिला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचा पाच हजार रुपयेचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला .
२०२३ / २०२४ या वर्षी इयत्ता दहावीत शिकत असताना प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे ही जिल्हा परिषद कन्या प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला होता त्यानंतर तेथील मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांनी सदरील राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारा साठी फाईल दाखल करण्यात आली होती त्या नुसार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा अध्यक्ष मारुती खारवे ,सिव्हील अभियंता अजयकुमार बागडे पालक पत्रकार दादासाहेब बनसोडे सहशिक्षिका लिलावती कौरव शिक्षक दत्तात्रय सगर , केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव , मिलींद कुलकर्णी , हारुण आत्तार , अश्विनी साळुंखे , निर्मला गावित , प्रज्ञा कांबळे लिपीक आप्पा स्वामी आदि जनांच्या उपस्थितीत पाच हजार रुपयेचा चेक धनादेश [ पुरस्कार ] देण्यात आला . या धनादेश पुरस्कार मिळाल्या मुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत