कोणाचा पैसा कोणाच्या घश्यात?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी बेसूर डी. जे. च्या तालावर वेडे वाकडे केस रंगवून मद्यधुंद आवस्थेत धांगड धिंगा करून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करतोय की अपमान?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले वाचा. आम्ही वाचन सोडलं आणि नाचन सुरु केलं.नाचून कोणाचे भले झाले नाही मित्रांनो चला आपण पुन्हा नाचण्याकडून वाचनाकडे वळूया.
डी. जे. नावाच्या महा भयंकर रोगाला आळा घालूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञा सूर्या सोबत आपला वेडा वाकडा चेहरा बॅनरवर छापण्याचा मोह टाळूया. विचार करा आपण दर वर्षी डी. जे. आणि बॅनरवर किती खर्च करतोय. एवढी सरी रक्कम विधायक कार्यालय लावली तर…?
महाराष्ट्रात
36 जिल्हे
358 तालुके
40000 गावे आहेत
बॅनर खर्च
एका गावात 10 बॅनर प्रमाणे
10 बॅनरचे एक हजार रुपये प्रति बॅनर धरले तर एकूण 10000/- रुपये होतात.
40000 गावात लागणारे बॅनर 400000000/-रुपये
आता एका तालुक्यातील बॅनर किमान दुप्पट होतात
20 ×1000=20000/-रुपये
20000×358= 7160000
प्रत्येक जिल्ह्यात लागणारे बॅनर
किमान एका जिल्ह्यात 100 बॅनर
एक बॅनर किमान 3000/- चा
3000×100=300000
300000×36= 10800000
डी जे वर होणारा खर्च
प्रत्येक गावात
किमान 10000/-रुपये एका डी. जे साठी लागले तर
40000 गावात
400000000/-रुपये
तालुक्यातील डी जे
किमान 25000×358=8950000/-
जिल्ह्यावर लागणार डी. जे. किमान 50000/-
एका शहरात किमान मोठे 10 जयंती मंडळे असतात.
50000×10=500000
500000×36= 180 00000
सर्व एकत्र केल्यास काय बजेट होईल ते पहा…..?
एका मुंबईचा खर्च 10 जिल्ह्याच्या बरोबर असतो. तो एकच जिल्हा हिशोबात जोडलेला आहे.
कोणाचा पैसा कोणाच्या घशात?
याचा समाजाला काय फायदा?
बार्टीचे वार्षिक बजेट 250 कोटी,
केवळ D. J. आणि बॅनरचा खर्च योग्य कामासाठी वापरला तर प्रत्येक जिल्ह्यात एक बार्टी स्वबळावर उभी करू शकतो.
कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही.
सर्व जयंती मंडळ विहार समित्याकडे वर्ग करून त्यांचे ऑडिट करावे.
सर्व विहार समित्याची एक जिल्हा समिती नेमून तिच्याकडे ठराविक निधी जमा करावा.
प्रत्येक विहार समितीने
स्थानिक लेवलवर
समाजातील बांधवांसाठी मोठे भव्य दिव्य प्रत्येक तालुक्यातील ठिकाणी मंगल कार्यालय उभारावे.
विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्य अभ्यासिका निर्माण करावी.
समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन होणे गरजेचे आहे.
सामान्य ज्ञान स्पर्धा
निबंध स्पर्धा
गीत गायन स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
शेवटच्या दिवशी
रांगोळी स्पर्धा घ्याव्यात
विविध विषयावर चर्चासत्र
व्याख्यानाचे आयोजन करावे.
अन्नदान वाटप हे आज समयोचित नाही.
तिकडे भंडारे करतात म्हणून आम्ही 14 एप्रिल बाबांची जयंतीला भंडारे करतो,हे उचित नाही. अन्नदानपेक्षा ज्ञान दान अतिउत्तम असते.
दारूपिऊन , D J वर
नाचण्यावरून दंगली घडतात.
या गोष्टी समाजासाठी घातक आहेत.त्या ताबडतोब बंद केल्या पाहिजेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत