महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

“ब्लॉकचेन तंत्रज्ञान – जनसामान्यांसाठी वरदान”

– अविनाश कव्हळे
तांत्रिक सहाय्यक – संजीव कसबे
….. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत की हे तंत्रज्ञान सत्य, विश्वासपात्र व पारदर्शक आहे.या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब लोकशाहीतील संस्था, कायदेमंडळ, निवडणूक प्रक्रिया, देशाचा वार्षिक अर्थसंकल्प यामध्ये केला तर त्यामध्ये विश्वासपात्रता, पारदर्शकता, सत्यता येते व जनसामान्यांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरते.
लोकशाही सशक्त व मजबूत करण्याकरीता जगातील लोकशाही राष्ट्र आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत , याचे विवेचन या पुस्तकात आहे.
जगातील अनेक लोकशाही राष्ट्रांनी निवडणूक पध्दत निर्दोष, पारदर्शक,स्वतंत्र व नि:पक्ष असावी याकरिता त्यात अनेक बदल केले आहेत.
ते म्हणजे :-

  1. अनुपातिक/प्रमाणशीर प्रतिनिधित्व निवडणूक पध्दत.
  2. लोकप्रतिनिधींना माघारी बोलविण्याचा मतदारांचा आधिकार.
  3. निवडणूक प्रचार केवळ सरकारी निधी द्वारे होईल.
  4. प्रचार माध्यम नियमन कायदा.
  5. देशांतर्गत निवडणूकीत संयुक्त राष्ट्र संघठना व ईतर जागतिक संस्थेची देखरेख, निरीक्षण व पर्यवेक्षण.
  6. जागतिक दर्जाच्या उच्च तांत्रिक संस्थेकडून लेखापरीक्षण केलेल्या ब्लॉकचेन व ईतर तंत्रज्ञानाचा लोकशाहीतील संस्था, अर्थसंकल्प व निवडणूक पध्दत यामध्ये अवलंब.
    काही देश EVM ला सक्षम पर्याय म्हणून लेखापरीक्षण केलेल्या सार्वजनिक ब्लॉकचेन (Public Blockchain) चा उपयोग निवडणूक पध्दती मध्ये करत आहेत.
  7. प्रमाणशीर प्रतिनिधित्व निवडणूक पध्दत.
    या निवडणूक पध्दती मध्ये बॅलेट पेपर वर केवळ राजकीय पक्ष व त्यांचे चिन्ह असते. उमेदवाराचे नाव नसते. मतदार पक्षाला मतदान करतात. संपूर्ण देशात एखाद्या पक्षाला किती मत मिळाली त्या प्रमाणात पक्षाचे उमेदवार कायदेमंडळात जातात. उदा. एखाद्या पक्षाला संपूर्ण देशात 10% मते मिळाली, तर त्या पक्षाचे 54 खासदार असतील. ( 543 चे 10% = 54) . हि नि. पध्दत अनेक देशात कार्यरत आहे.
    फायदे :
    A) या निवडणूक पध्दतीत कुणाचेच मत वाया जात नाही.
    प्रत्येक मताला प्रतिनिधित्व मिळते, व समान मूल्य असते.
    B) प्रत्येक पक्ष स्वतंत्र असतो, प्रस्थापित मोठ्या पक्षाचा B टीम नसतो.
    C) बहुमताचे सरकार स्थापन होते. सध्या आस्तित्वात असलेल्या निवडणूक पध्दतीत केवळ 35% मते मिळाली तरी तो उमेदवार निवडून येवू शकतो. 65% मतदारांना शून्य प्रतिनिधित्व मिळते. त्यांच्या मताचे मोल शून्य होते. No voice, no representation means NO Democracy. प्रमाणशीर नि. पध्दती मध्ये प्रत्येक मताला प्रतिनिधित्व मिळते.

D) प्रस्थापित मोठे पक्ष विरोधी पक्षाचे मत विभाजित करण्या करीता (मत खाणे) मुद्दाम काही उमेदवार उभे करतात. यास प्रतिबंध होतो.
E) वंचित घटकांच्या लहान समूहातील राजकीय पक्षांना देखील संसदेत प्रतिनिधित्व मिळते.

  1. तंत्रज्ञानाने अनेक वेळा खात्रीशीर पध्दतीने निवडणूक घेता येते. काही देशात लोकप्रतिनिधी योग्य तर्हेने कार्य करत नसेल तर त्याला माघारी बोलविण्यात येते. तेथे खर्या अर्थाने प्रजेच्या हाती सत्ता आहे.
  2. काही युरोप मधील देशांनी Public Funding to Candidates असा कायदा पारीत केला आहे. तेथे निवडणूक प्रचार खर्च सरकारकडून होतो. स्वत: उमेदवार, त्याचा पक्ष किंवा भांडवलदार यांना निवडणूक प्रचार खर्च करण्यास मनाई असते.
  3. प्रचार माध्यम नियमन कायद्यामुळे निवडणूकीच्या सहा महिने पूर्वी सर्व खाजगी वर्तमानपत्र व खाजगी दूरदर्शन वाहिन्या बंद असतात. केवळ सरकारी वर्तमानपत्र व सरकारी दूरदर्शन वाहिनी सुरू असते. यामुळे सर्व राजकीय पक्षांना जाहिरात करण्याची समान संधी मिळते.
  4. निवडणूकीत गैरप्रकार होऊ नयेत म्हणुन अनेक देश जागतिक संस्थांना देखरेख करीता बोलवितात.
  5. लोकशाहीतील सर्व कारभारात पारदर्शकता व विश्वासपात्र पध्दतीने कामकाज चालण्याकरीता लेखापरीक्षण केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो.
    जनहितार्थ असे अनेक बदल युरोपियन देशात झाले आहेत व लोकशाही सशक्त होत आहे. आपल्या भारत देशातील नागरीकांना याबाबत माहिती व्हावी म्हणून लवकरच पाच ते सहा महिन्यात पुस्तक प्रकाशित होईल.

जगात होत असलेल्या वरील सहा बदला पैकी केवळ लोकशाहीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर याविषयी पुस्तक आता प्रकाशित होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!