दिन विशेषदेशदेश-विदेशभारतमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

प्रजासत्ताक_दिन म्हणजे काय हेच काही लोकांना माहीत नसते.आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्याने आपण जाणून घेऊ की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ?

???? धम्मप्रचारक विनय ढोके बौध्द सहसचिव महाबोधि उपासक संघ नागपुर महाराष्ट्र ????
समाज माध्यमातून साभार….
सध्दम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो.

आपण,देशासाठी शहिद झालेल्या सैनिकांसाठी शहीद गीते ऐकतो,वाजवतो हे सर्व या दिवशी चुकीचे आहे. या दिवशी कुणीही शहीद झाले नाही किंवा कोणते युद्ध या आपण जिंकलो नाही. या दिवशी आपण संविधानाविषयी जाणून घ्यावे,संविधानाचे महत्व इतरांना पटवून द्यावे.

शाळांमध्ये-महाविद्यालयात संविधानाबाबद विद्यार्थ्यांस सखोल माहिती द्यावी. पण ते जाणीवपूर्वक टाळल्या जाते. व देशभक्ती गीते व पाकिस्थान विरोधी युद्धचित्रपट दाखवल्या जाते.

प्रजासत्ताक दिनाचे खरे महानायक ठरतात ते भारतीय राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवसापासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अथक कार्यपूर्तता सार्थकी लागली.
थोडक्यात जाणुन घेऊया भारतीय संविधान .

???? भारतीय संविधान ???? ( राज्यघटना ) ????

???? संविधान म्हणजे काय ? ( संक्षिप्त )

???? संविधान हे देशातील लोकांच्या आकांक्षांचे व्यक्त रुप आहे .
???? संविधान हे देशाची तत्वप्रणाली मांडण्याचे साधन आहे .
???? संविधान म्हणजे देशातील सर्व लोक समुहांच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारा असा सर्वमान्य असा कायदा आहे .
???? संविधान म्हणजे एक आधुनिक राष्ट्र घडविण्याचा सामुहिक निर्धार आहे .

???? एखाद्या देशात त्या देशाची सत्ता वापरणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंधित ज्या विविध संस्था , विभाग असतात ते सर्व एकमेकांशी विशिष्ट नियमाने जोडलेले असतात व त्या नियमानुसारच ते आपआपले कार्य करतात . देशातील या सर्व घटकांचे , संस्थांचे , विभागांचे कार्य त्यांचे अधिकार व त्यांची मर्यादा स्पष्ट करणाऱ्या नियमांना राज्यघटना अथवा संविधान असे म्हणतात .

???? भारतीय संविधान ( राज्यघटना ) निर्मिती प्रक्रिया ????

???? कॅबिनेट मिशनने प्रस्तावित केल्याप्रमाणे १९४६ साली प्रांतिक विधानमंडळावर निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान करून संविधान सभेसाठी एकूण ३८३ सदस्य निवडले या तरतुदीनुसार घटना समिती निर्माण झाली . त्यापैकी काॅंग्रेस पक्षाला २१२ , मुस्लिम लीगला ७३ आणि इतर पक्षांना ११ जागा मिळाल्या . संस्थानांसाठी असलेल्या ९७ जागांसाठी निवडणूका झाल्या नाहीत त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले . मुस्लिम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला . घटना समितीत जवाहरलाल नेहरू , डॉ राजेंद्र प्रसाद , सरदार वल्लभभाई पटेल , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , मौलाना आझाद , हे व इतर बहुसंख्य सदस्य हे काॅंग्रेस पक्षाचे होते . तरीही *#शेड्युल #कास्ट #फेडरेशनचे #नेते ( #अध्यक्ष ) #डाॅ #बी #आर #आंबेडकर , मुस्लिम लीगचे नेते महंमद सादुल्ला , हिंदू महासभेचे नेते शामाप्रसाद मुखर्जी , तसेच सरोजिनी नायडू , विजयालक्ष्मी पंडित , बेगम रसूल खद , दुर्गाबाई देशमुख , हंसा मेहता आणि रेणुका रे या प्रसिद्ध व यशस्वी महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता .

???? या संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीत झाली . मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता . ११ डिसेंबर १९४६ च्या संविधान सभेच्या बैठकीत सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली . संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची निवड करण्यात आली .

???? मसुदा समितीच्या पहिल्या बैठकीत २९ आॅगस्ट १९४७ ला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर * यांची निवड करण्यात आली . भारत सरकारच्या राजपत्राव्दारे घटनेचा मसुदा जनतेच्या माहितीसाठी व जनतेकडून सुचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता . संविधान सभेने या मसुद्यावर ४ नोव्हेंबर १९४७ पासून ते २६ नोव्हेंबर १९४९ एवढा प्रदीर्घ काळ चर्चा केली . या चर्चेदरम्यान नागरिकांकडून आलेल्या ७६३५ पैकी २४७३ सुचनाही सभेने विचारार्थ घेतल्या .

???? यातून भारतीय राज्यघटना ही विस्तृत १२ हजार पानांची तयार झाली . लिखीत व जगातील सर्वात मोठी अशी ही राज्यघटना आहे . सुरुवातीला राज्यघटनेत २२ प्रकरणे , ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती . आज भारतीय राज्यघटनेत २५ प्रकरणे ४४८ अनुच्छेद आणि १२ परिशिष्टे आहेत . या कालावधीत संविधान सभेची ११ सत्रे व १६५ बैठकी संपन्न झाल्यात . २२ नोव्हेंबर १९४९ पर्यन्त संविधानावर ६३ , ९६ , ७२९ रुपये खर्च झाला होता . संविधान निर्माण प्रक्रियेचे दर्शक दिर्घेतून ५३ हजार दर्शकांनी अवलोकन केले . संविधानावर हस्ताक्षर करण्यास दि . २५ जानेवारी १९५० रोजी संविधानाच्या तीन प्रती सभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या . एक इंग्रजी प्रत हस्तलिखित व चित्रकारांच्या कलाकृतींनी अलंकृत केलेली होती . एक इंग्रजी छापील प्रत होती तसेच एक हिंदी हस्तलिखित प्रत होती . सभेच्या अध्यक्ष्यांनी सदस्यांना विनंती केली की त्यांनी तिन्ही प्रतिवर सह्या कराव्या .

???? #डाॅ #बाबासाहेब #आंबेडकर #संविधानाचे #मुख्य #शिल्पकार ????

???? संविधान निर्मितीत अनेक मान्यवरांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे ज्यांचा उल्लेख स्वत: डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणात केला आहे . या सर्व प्रक्रियेत मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका अतिशय महत्त्वाची राहिली . मसुदा समितीचे अन्य सदस्य आजारपण , परदेश वास्तव्य , मृत्यू अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे या कामात सहभागी होऊ शकले नाहीत . संविधान सभेत सदस्यांनी केलेल्या विविध सुचना कायदेशीर भाषेत आणि सर्वमान्य अशा पध्दतीने शब्दबद्ध करणे तसेच चर्चेतील मुद्द्यांबाबत इतर देशांच्या संविधानांमध्ये असलेल्या तरतुदी सदस्यांच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे या जबाबदाऱ्या * बाबासाहेब * पार पाडत होते . विविध सामाजिक घटकांचे आग्रही प्रतिनिधित्व करणारे संविधान सभेचे सदस्य आणि त्यांच्या परस्परविरोधी मतमतांतरातून सर्व भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारे संविधान सर्वसंमतीने बनविले यासाठी #डाॅ #बाबासाहेब #आंबेडकर आणि #संविधान #सभेचे सर्व सदस्य यांचे आपण सदैव ऋणी राहीले पाहिजे . ????????

???? जय संविधान ???? जय भिम ???? जय भारत ????????????
???????? भारतीय संविधान चिरायु हो ????????????????????

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!