
75 वा 26 जानेवारीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 76 वर्षापासून मनुस्मृति लागू होणार आहे?..आपण बेजबाबदारपणे रहाणे आपल्या समाजसुधारकांशी गद्दारी केल्याप्रमाणे आहे 26 जानेवारी चा कार्यक्रम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला मानवंदना देणारा असावा या दिवशी आपण खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या दिवशीच निर्माण झालेले आहे आणि या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचेच पूजन व्हावं 26 जानेवारी हा दिवस संविधानामुळे निर्माण झालेला आहे प्रजासत्ताक आपण झालेलो आहोत म्हणून याच दिवशी गुलामगिरीकडे नेण्यासाठी मनुस्मृतीचे वाचन सुरू झालेले आहे हे लक्षात ठेवा 140 वर्षाच्या समाजसुधारकाच्या संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं परंतु 75 वर्षानंतर अमृत महोत्सव सादर करण्याऐवजी अस्पृश्यता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे कसे निर्माण होईल नवीन एक षडयंत्र निर्माण झालेल आहे शिक्षणाचे बाजारीकरण झालेले आहे उदारीकरण झालेले आहे खाजगीकरण झालेले आहे आरक्षण बंद होत आहे राजकारण शून्य झालेले आहे आणि गटातटामध्ये वाद विवाद करून आपण मैत्री आणि बंधूता हे विसरत चाललेलो आहो म्हणून गटातटा मध्ये विभाजन न होता एकत्र समाज कसा येईल भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल यांच्या माध्यमातून आता एकत्र येणे गरजेचे आहे हेवे दावे सोडून मैत्री आणि बंधुता निर्माण करणे हे काळाची गरज आहे अन्यथा गुलामगिरीचा सूर्य निघलेला आहे याचा सर्वांनी विचार करावा लवकर या…. सरकारी शाळा बंद होत आहे कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद भरल्या जात आहे,नोकऱ्या भविष्यात मिळणार नाही आणि आज शैक्षणिक बाजारीकरण बाजार व्यवस्था,, शैक्षणिक क्षेत्र आपले राहिले नाही, आज आपले कारखाने नाही आज आपले शिक्षण नाही आज आपण संविधान समजून सांगल्याशिवाय सविधानाबद्दल प्रेम आपुलकी मैत्री होणार नाही फंडामेंटल ऑफ राईट अधिकार लोकांना माहीत होणार नाही हे सर्वांचं संविधान आहे म्हणून एससी एसटी ओबीसी आपले बांधव आहेत त्यांच्यापर्यंत संविधान मेल्या शिवाय या देशांमध्ये प्रतिक्रांतीचे जे वारे आहे हे आपण थांबू शकत नाही सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम 🌹
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत