पुणे येथील ५ विध्यार्थी देवगड समुद्रामध्ये बुडाले.

चार मुलींचे मृतदेह आढळले, एक मुलगा बेपत्ता
पुणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या खासगी सैनिक अकॅडमीचे पाच विद्यार्थी शनिवारी देवगड समुद्रात बुडाले. त्यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून, मुलगा बेपत्ता आहे.
पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीच्या ३६ विद्यार्थ्यांची सहल देवगड येथे आली होती. हे विद्यार्थी आंघोळीसाठी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील पाच जण बुडू लागले. अन्य काही विद्यार्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला आणि हे पाचही जण खोल पाण्यात गेले. चार मुलींचे मृतदेह सापडले असून, एक जण बेपत्ता आहे.
प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे (सर्व १८ ते २४ वयोगटातील) अशी मृतांची नावे आहेत. राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत