ग्रामीण शेतकरी, डोंगराळ आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणाच्या मुळावर नेमक कोण आणि का उठलेल आहे ?

शांतपणे विचार करून मनाला प्रश्न विचारा आणि उत्तर शोधा.
पटसंख्या कमी असलेल्या एक शिक्षकी किंवा दोन शिक्षकी शाळांचा मुद्दा कळीचा आहे जिथ परवडत नाही अस सरकार म्हणत बरोबर का ?
या शाळा सरकारी आहेत ?
या शाळेचा खर्च काय असतो ?
शिक्षकांचा पगार , शाळेचे वीजबिल आणि भाडे , आस्थापना खर्च ?
इमारती गावाने दिलेल्या किंवा स्थानिक दानशूर लोकांनी दिलेल्या जमिनीवर आहेत म्हणजे त्यांचाही खर्च नाही.सरकारी जमिनी असल्या तरी त्यावर बांधलेल्या इमारती खेड्यात कुठं व्यापारी उपयोगात येणारेत ?
मग मेंटेनन्स खर्च म्हणावा तर दुर्गम भागात वीज सोडून खर्च नाही.
त्याच बिल मुळात दिवसाची शाळा असेल तर दोन खोल्याच किती येणार ?
एकशिक्षकी शाळा असतील तिथ शिपाई, क्लार्क, मुख्याध्यापक हि भानगड नाही ?
म्हणजे शाळेचा ९० टक्के खर्च कशावर ? शिक्षकाच्या पगारावर ?
इथवर बरोबर आहे का ?
मग जर सरकार या शिक्षकांच्या नोकऱ्या कायम ठेवणार असेल तर खर्च कमी होतो का ?
म्हणजे परवडत नाही हा मुद्दाच निकालात निघाला ना ?
नंतर दिलेलं कारण होत ‘ संघभावना वाढीला लागणे आणि सामुदायिक शिक्षण ‘
संघभावना, वाटून घेण्याची वृत्ती या गोष्टी पाच दहा पोरांत पण शिकवता येतात आणि सामुदायिक शिक्षण दोन शिक्षक तीन चार वर्गाला शिकवत असतील तर ते आधीपासूनच सुरु आहे.
म्हणजे हेही कारण लंगड आहे हे सिद्ध होत ना ?
तीन चार किलोमीटर लांब प्रवास करणे आणि शाळेला जाणे प्राथमिक शाळेच्या मुलांना अशक्य आहे यावर तुमच्याकडे तोडगा आहे का ?
जर स्कूल बस सुरु करणार असाल तर मग महिन्याला इतका अवाढव्य खर्च इंधन, चालक , सहायक यांच्यावर करण्यापेक्षा आहे त्या शाळाच सुरु ठेवणे व्यवहार्य नाही का ?
मग खर्च कधी कमी होईल ?
जेव्हा त्या गावातली शाळा बंद करून मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवल आणि शिक्षकांची बदली केली कि साहजिकच गावात नव्याने प्रवेश घेणारी मुल लांबच्या शाळेत जाणे शक्य असेल तरच प्रवेश घेतील ?
अस करत टप्प्या टप्प्याने या शाळेतून गळणाऱ्या मुलांची संख्या वाढेल आणि प्रत्यक्षात शिकणारी मुल कमी होतील.
अशी मुल कमी झाली कि निवृत्त झाल्यावर शिक्षकांची भरती करायची गरजच पडणार नाही आणि जरी करावी लागली तरी कंत्राटी भरती केली जाईल.
म्हणजे मुलांची संख्या कमी होऊन शिक्षकांची गरजच कमी झाली कि खर्च कमी होईल ना ?
म्हणजे शाळेत शिकणाऱ्या मुलांची संख्याच कमी होणे हा कळीचा मुद्दा.
समजल का ?
ग्रामीण , शेतकरी, डोंगराळ ,आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणाच्या मुळावर नेमक कोण आणि का उठलेल आहे ?
आपल्याधडावरआपलेच_डोके
ज्याचीलाजत्याचाच_माज
महाराष्ट्र_देशा
शिक्षणहक्क
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत