ब्राह्मण आणि ब्राह्मण्य

अर्थात : ऊंची दूकान और फिकी पकवान!
ब्राह्मण आणि ब्राह्मण्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आजवर ब्राह्मणांवर अनेकांनी लिहिलं आहे, लिहित आहेत, लिहणार आहेत, पण ब्राह्मण्यावर आपल्या ‘जानेत’ अर्थात ‘जाणिव नेणीवान्वेषी तर्कशास्त्रा’धारे अचूक बोट ठेवून तिचा पर्दाफाश केला तो शपांनी.
■ ब्राह्मण्य म्हणजे काय?
ब्राह्मण्याची निश्चित परिभाषा सांगता येणार नाही. कारण ते ‘बहुलक्षणी’ आहे. त्याच्या विविध लक्षणातून ते प्रतिबिंबित होत असते. “जात, वर्ग, वर्ण (रंग), लिंग, अवस्था, भाषा, धर्म, प्रदेश इत्यादींचा दुराभिमान बाळगणारी, त्याआधारे माणसामाणसात भेदभाव करणारी, म्हणजेच विषमतेचं समर्थन करणारी प्रतिगामी मानवी प्रवृत्ती म्हणजे ब्राह्मण्य!” थोडक्यात ब्राह्मण्य हा एक मनोविकार आहे. व कोणालाही त्याची लागण होऊ शकते.
■ या मनोविकराला ‘ब्राह्मण्य’ का म्हणतात?
ब्राह्मण्य या मनोविकाराची लागण जर कोणालाही होऊ शकते, तर मग त्याला ‘ब्राह्मण्य’ म्हणून का संबोधले जाते? याचे कारण या मनोविकाराची लक्षणं सर्वप्रथम ब्राह्मण वर्णात आढळली. त्यामुळे त्याच्या नामकरणाचा मान, अर्थातच ब्राह्मण वर्णाने पटकावला. नुसताच पटकावला नाही, तर ब्राह्मण वर्णाने त्याची हजारो वर्षे पिढ्यानपिढ्या निष्ठापूर्वक व मनोभावे जपणूकही केली. परिणामी ‘ब्राह्मण्य’ हा ब्राह्मण वर्णाचा स्वभावधर्मच बनला. व ब्राह्मण आणि ब्राह्मण्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
❆ ब्राह्मण्याची लक्षणे :
बहुलक्षणी ब्राह्मण्याची काही प्रमुख लक्षणं खालील प्रमाणे –
■ ब्रह्म सत्य जगन्मिथ्या मानते :
जे अस्तित्वात नाही त्याला सत्य व अस्तित्वात असलेल्या गोष्टीला मिथ्या म्हणजे तुच्छ, निरर्थक मानणे. हे ब्राह्मण्याचे प्रमुख लक्षण आहे.
■ वर्ण व जातिव्यवस्थेचे समर्थक :
माणसाची योग्यता, अयोग्यता तसेच श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व हे गुणकर्माच्या अधारे नव्हे, तर जन्माच्या आधारे ठरविते.
■ पुरुषप्रधान व पुरुषसत्ताक समाजव्यवस्था श्रेष्ठ मानते :
स्रीवर्गाला कनिष्ठ मानणारी, लिंगाच्या आधारे भेदभाव करणारी पुरुषप्रधान व पुरुषसत्ताक समाजव्यवस्था ब्राह्मण्य श्रेष्ठ मानते.
■ नाम बड़े और दरशन खोटे :
“लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण स्वत: कोरडे पाषाण” ही म्हण ब्राह्मण्याचे यथार्थ चित्रण करते. सत्य, नैतिकता, शुचिता, योग्यता इत्यादी सद़्गुण हे ब्राह्मण्यग्रस्त व्यक्तीचे फक्त बोलण्याचे विषय असतात. त्यांचा ते नुसता आव आणतात. पण त्यांच्या कृतीत त्यांचा लवलेशही नसतो. परिणामी उक्ती आणि कृतीत विसंगती हे ब्राह्मण्याचे ठळक लक्षण आहे. म्हणूनच,
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असे तुकोबांनी लोकांना बजावले होते.
तर जॉर्ज बर्नार्ड शॉंनीही म्हटले होते, 'अतिप्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेची भाषा करणारी माणसं अगोदर तपासली पाहिजेत!'
■ उंची दूकान और फिकी पकवान :
सत्य, शुद्धता, दर्जेदारपणाच्या मक्तेदारीचा आव आणणाऱ्या ब्राह्मण्यग्रस्तांच्या संस्था, संघटनांची प्रत्यक्षात ‘उंची दूकान और फिकी पकवान’ अशी अवस्था असते.
■ मूल्यहिन :
ब्राह्मण्याची कोणत्याही मूल्याशी बांधिलकी नसते. वारा वाहिल तशी ते पाठ फिरविते. अनेक तोंडांनी बोलते व लोकांना संभ्रमात ठेवण्यासाठी कधी हे तर कधी ते खरे आहे म्हणते.
■ चिकित्सेला सक्त विरोध :
ब्राह्मण्यग्रस्तांचा चिकित्सेला सक्त विरोध असतो. नीरक्षीरविवेकांची म्हणजे ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्याच्या ते गप्पा करतात. पण चिकित्सेमुळे असत्यावर आधारित ब्राह्मणी मनोरे ढासळण्याच्या भीतीमुळे चिकित्सेच्यावेळी, ती टाळण्यासाठी ते बहानेबाजी करु लागतात.
■ गुरु महात्म्य :
गुरु बनून दुसऱ्याच्या यशाचे फुकटात श्रेय लाटता येते. उदाहरणार्थ – चाणक्य, दादू कोंडदेव, रामदास इ. तर गुरु बनून भरारी घेणाऱ्यांचे पंख छाटता येतात. उदाहरणार्थ – द्रोणाचार्य. यामुळे ब्राह्मण्यग्रस्त गुरुचं स्तोम माजवतात.
■ हातचं राखून ठेवणे :
शिष्याने आपल्यावर कुरघोडी करु नये, म्हणून ब्राह्मण गुरु संगळं ज्ञान शिष्याला न देता काही गोष्टी हातच्या राखून ठेवतात. हे शिष्यांना ठाऊक असल्यामुळे गुरुविषयी ते कायम ‘भीतीयुक्त आदर’ बाळगून असतात.
■ कृतघ्नता :
अनुत्पादक ब्राह्मण वर्ण राजे, धनिक यांचेकडून मिळणाऱ्या दानदक्षिणा आणि बहुजन वर्गाच्या सेवासुविधांचा लाभ घेत असतो. दुसऱ्यांच्या जीवावर जगण्याचा न्यूनगंड वाटू नये म्हणून खाऊन-पिऊन वरुन “आम्ही काय कुणाचे खातो, तो हरि आम्हाला देतो” अशी दर्पोक्ती ते करतात.
■ प्रचंड हेकेखोर :
कितीही पुरावे सादर केले तरी आपलंच म्हणणं खरं मानणे,आपलेच घोडे पुढे दामटणे. हे ब्राम्हण्यग्रस्त मानसिकतेचे ठळक लक्षण असते.
दादोजी कोंडदेव व रामदास हे शिवरायांचे गुरु नाहीत हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे व न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तरीही ब्राह्मण्यग्रस्त मनोरुग्ण ते मानायला तयार नाहीत. तसेच शिवजयंती तिथीप्रमाणे नव्हे तर तारखेप्रमाणे साजरी करावी हा शासननिर्णयही त्यांना मान्य नाही.
इतकंच नव्हे तर तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, जनगणमन हे राष्ट्रगीत या गोष्टीही त्यांना मान्य नाहीत.
कुत्र्याचं शेपूट सरळ होईल पण ब्राह्मण्याचं वाकडं शेपूट सरळ होणार नाही.
■ चोर सोडून सन्याशाला सूळावर चढविणे :
रामायणात सर्पदंशाने मेलेल्या ब्राह्मणपुत्राच्या मृत्युला शूद्र शंबुकाला जबाबदार धरुन ब्रह्मवृंदाने रामाकरवी शंबुकाचा शिरच्छेद करविला. आपल्या प्रतिस्पर्धींचा काटा काढण्यासाठी चोर सोडून सन्याशाला सूळावर चढविण्याच्या असंख्य घटना इतिहासात पहावयास मिळतात.
■ दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक धरणे – किंवा – करुन सवरुन नामानिराळे राहणे :
सीतेच्या चारित्र्याचा संशय प्रत्यक्षात ब्राह्मणाने घेतला. पण नोंद शूद्र धोब्याच्या नावावर केली. व सीतात्यागाचे पातक धोब्याच्या माथी फोडून धोब्यांची बदनामी केली आणि स्वतः ‘जय सियाराम’चा जप करायला मोकळे झाले.
■ मानसन्मानाचा सोस :
पद, प्रसिद्धी, पुरस्कार, पैसा याचा ब्राह्मण्याला कमालीचा सोस असतो. तो त्यांना जन्मसिद्ध अधिकार वाटतो. तो मागून घ्यायची त्यांना लाज वाटत नाही. जर तो मिळाला नाही तर तो मिळेपर्यंत ते प्रसिद्धी माध्यमांच्या ‘शाऊटींग ब्रिगेड’ मार्फत हाकाटी पिटून शासनाला भंडावून सोडतात. ‘ब्राह्मण्य उपवाशी राहू शकते उपेक्षित राहू शकत नाही.’
■ राजाश्रयी :
पद, प्रसिद्धी, पुरस्कार, पैसा याचा सोस पुरवूण घेण्यासाठी ब्राह्मण्य राजाश्रयाची निरंतर कास धरते. आपल्या पोळीवर तूप कमी पडल्याखेरीज ते राजसत्तेच्या विरोधात जात नाही. सत्ताधाऱ्यांच्या जवळीकीमुळे लोकही वचकून राहतात आणि त्यांचे मार्फत आपल्या शत्रुंचा काटाही काढता येतो. म्हणून प्रतिशोध घेण्यासाठीचे राजाश्रय हे ब्राह्मण्याचे हुकमी साधन असते.
थोडक्यात राजाश्रयाशिवाय ब्राह्मण्य जगूच शकत नाही. राजाश्रय हा ब्राह्मण्याचा प्राणवायू असतो.
■ पुरोगामी ब्राह्मणांची नेणीवही ब्राह्मणी असते :
आधुनिक काळात ज्ञानविज्ञानाच्या प्रसारामुळे ब्राह्मणातूनही पुरोगामी विचारवंत उदयाला आले. तथापि पुरोगामी ब्राह्मण विचारवंतांची जाणीव अब्राह्मणी असली तरी, नेणिव मात्र ब्राह्मणीच राहिल्यामुळे त्यांचे निष्कर्ष, त्यांची अनुमाने, काढलेले अन्वयार्थात यातून त्यांच्या नेणीवेत दडलेले ब्राह्मण्य डोकावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच ‘पुरोगामी ब्राह्मण व प्रतिगामी ब्राह्मण या एकाच शरीराच्या उजव्या-डाव्या भुजा आहेत’ असे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.
■ ब्राह्मण्यग्रस्त पुरोगामी :
◆ आगरकर :
अग्रणी सुधारक म्हणून सुधारकात आगरकरांचं नाव घेतलं जातं. तथापि आपल्या ब्राह्मण जातीचा त्यांना विशेष अभिमान वाटत असे.
◆ ब्राह्मण्यग्रस्त टिळक :
• महात्मा फुलेंच्या निधनाची वार्ता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकची केसरीत जाहिरात छापण्यास टिळक नकार देतात. व जाहिरातीचे पैसे परत पाठवितात.
• स्वतःला तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणून घेणारे टिळक विधीमंडळात तेल्यातांबोळ्यांना प्रतिनिधित्व देण्यास सक्त विरोध करतात.
• समुद्र उल्लंघनाचे प्रायश्चित्त म्हणून पुरोहितांनी सांगितलेले कर्मकांड निमूटपणे करवून घेतात.
◆ सावरकर :
विज्ञानवादी सावरकरांचं ब्राह्मण्यही त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकातून पानोपानी ठिबकतांना दिसते. त्यांच्या नेणीवेत दडलेलं ब्राह्मण्य त्यांना ‘अप्रामाणिक’ बनू देत नाही. शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या ऐतिहासिक कार्याला ‘काकतालिय योग’ संबोधून ते प्रकटते.
◆ अत्रेंचे गुरु – गडकरी
आचार्य अत्रे पुरोगामी छावणीतले बीनीचे शिलेदार. पण राजसन्यास या नाटकात संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राम गणेश गडकरींना ते गुरु मानत. गुरुच्या या अपकृत्याविषयी मौन बाळगतात.
◆ टिळकभक्त ग. प्र. प्रधान :
समाजवादी छावणीतले ग. प्र. प्रधान तथा प्रधान मास्तर टिळकांचं गुणगान गातात. पण टिळक-आगरकरांना दहा हजाराचा जामीन देऊन तुरुंगातून सोडविण्याऱ्या महात्मा फुलेंच्या उल्लेखनीय योगदानाला अनुल्लेखाने मारतात. टिळकांच्या या उघड ब्राह्मण्याकडे प्रधान मास्तरांचे नेणीवेतले ब्राह्मण्य कानाडोळा करते.
◆ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी :
पुरोगामी छावणीतले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री कॉ. शरद् पाटलांच्या ‘दास शूद्रांची गुलामगिरी’ या ऐतिहासिक ग्रंथाची फक्त दीड पानाची प्रस्तावना लिहून बोळवण करतात.
◆ कुमार केतकर :
लोकसत्ताचे माजी संपादक, अभ्यासू पत्रकार, विचारवंत कुमार केतकर जेम्स लेन प्रकरणी संभाजी ब्रिगेडने भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर केलेल्या तथाकथित हल्ल्याचा कडाडून निषेध करतात. पण जिजाऊंची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन व त्याच्या बोलवत्या धन्यांविषयी मूग गिळून बसतात.
◆ नंबुदरीपाद :
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते इ. एस. नंबुदरीपाद हे प्रस्थापित वर्गाला संस्कृतीचे निर्माते मानतात.
■ ब्राह्मण्यवादी बहुजन नेते :
ब्राह्मण्याची लागण झालेले अब्राह्मणही ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण्यनिष्ठ बनतात. इतके ब्राह्मण्य हे जालिम असते. सत्तेची चटक, घराणेशाही, जातवर्णवर्चस्व, सामाजिक न्यायाची पायमल्ली, भ्रष्टाचार, गद्दारी इत्यादी ब्राह्मण्याची लक्षणे ब्राह्मण्यग्रस्त बहुजन नेत्यात ठासून भरलेली असतात.
कॉम्रेड शरद् पाटीलांनी म्हटले होते की, अनेक पुरोगामी व्यक्तींची जाणीव अब्राह्मणी (पुरोगामी) असली तरी, नेणीव अब्राह्मणी (प्रतिगामी) असते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी अनंतराव भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, नरहर कुरुंदकर आदि भल्या भल्या पुरोगाम्यांच्या नामांतराला असलेल्या विरोधातून कॉम्रेड शरद् पाटलांच्या विधानाची सत्यता पटली.
■ हलाहल ते हेच :
थोडक्यात सर्व दुर्गुणांचा अर्क म्हणजे ब्राह्मण्य. समुद्रमंथनातून बाहेर आलेले ‘हलाहल’, हे दुसरे तिसरे काही नसून, ते ‘ब्राह्मण्य’च होते.
शुक्रवार : – सुभाषचंद्र सोनार,
दि. ०५.०१.२०२४ : राजगुरुनगर.
*
https://www.facebook.com/share/p/1HP3FWKNcR/
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत