“राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी”-विजय वडेट्टीवार.

दि.१६ सप्टेंबर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, “राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी.
विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?
फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री), ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी) एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे.”
विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रांसाठी फाईव स्टार हॉटेल मधील 30 रूम बुक तसेच सर्व सचिवांसाठी ताज हॉटेल मध्ये 40 रूम बुक केले आहेत तसेच अमरप्रीत हॉटेल 70 रूम,अजंता अॅम्बेसेडर 40 रूम, महसूल प्रबोधिनी 100 रूम , पाटीदार भवन 100 रूम, सुभेदारी विश्रामगृहे – 20 रूम एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे.” ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी कुठेतरी थांबली पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत