बुद्धिवादी वर्गांचे कर्तव्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणा पॅक्टमध्ये अनुसूचित जातीसाठी राजकीय आरक्षण मिळवून दिलं; पण त्याचा पुरेपूर फायदा कोण घेत आहे, याचं चित्र या बातमीत दिसून पडते.
प्रश्न असा आहे की, आंबेडकरी राजकीय पक्ष का मागे पडत आहे, याचे विश्लेषण बुद्धिवादी वर्गांनी करून त्यावर ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. नव्हे ते त्यांचं कर्तव्य आहे असे बाबासाहेब ‘जातीव्यवस्थेचे निर्मुलन’ या पुस्तकात म्हणतात.
त्यांनी लिहलंय की,
‘थोर माणूस इतिहास घडवतो हा सिद्धांत तुम्ही स्विकारा अथवा स्वीकारु नका.
तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक, सत्ताधारी वर्ग नसला तरी प्रभावशाली वर्ग असतो.
बुद्धीवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो.
कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धीयुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही.
तो बहुंताशी अनुकरण करणारा असून बुद्धीवादी वर्गाचे अनुकरण करतो.
देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धीवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिशयोक्ती
नाही. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकट समयी पुढाकार घेवून तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो.
बुद्धी हा स्वायत्त सदगुण नाही हे खरे आहे. ती केवळ साधनमात्र आहे आणि साधनांचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ती कोणत्या हेतूंसाठी करते त्यावर अवलंबून असतो.’
आर.के.जुमळे
दि.३०.१२.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत