मराठवाड्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर.

मराठवाड्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात जुन महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरीही ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. आता सप्टेंबरचा अर्धा महिना संपला आहे. मात्र, अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.जर भर पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल, तर पुढील काळ चिंता वाढवणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे जनावरांना पावसाळ्यातच चारा नाही, तर हिवाळा आणि उन्हाळ्यात त्यांना खायला काय घालावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 60 पशुपालक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी मोफत बियाणे मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली आहे.
त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा आणि चाऱ्याच्या प्रश्न देखील गंभीर बनला आहे. पाऊस पडला नसल्याने हिरवीगार दिसणाऱ्या बंधाऱ्यावर गवत पाहायला मिळत नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जनावरांसाठी चारा खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून चारा लावण्यासाठी धडपड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आधीच खरीप पिकासाठी आहे ते पैसे टाकून बसलेल्या शेतकऱ्यांना चाऱ्याचा सामना करावा लागत असल्याने, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 60 पशुपालक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी मोफत बियाणे मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली आहे. विशेष म्हणजे विभागात अनेक जिल्ह्यात अशीच काही परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत