दिन विशेषदेशमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

6 डिसेंबर आला आता,

संतोष कांबळे


6 डिसेंबर आला आता, आमचा अभिमान जागा होईल, निवडणूकीत विखुरलेला सारा समाज आता एक होईल,! डॉ, बाबासाहेबांचा विजय असो,,,,! बोलो भीमभगवान कि जय,,,! सारा आसमंत दणाणून जाईल, फोटो ला हारतुरे घालून ,बापाच्या त्यागा वर चर्चा होईल, भाषणं होतील, पुन्हा इतिहास वाचला जाईल, भीमाच्या गिताची “डाँल्बी ” गल्ली पासुन दिल्ली पर्यत मन सारे सुन्न करेल, निवडणुकीतील लोकशाहीचे “नेते “आदरांजली अर्पण करतील, बाबांचा त्याग पुन्हा त्याच समाजाला सांगतील! ज्यांना निवडणुकीत पाचशेच्या नोटावर, हातभट्टीच्या घोटावर अनं मटणाच्या बोटीवर खरेदी केलेल्या मुर्दाड भीमसैनिकाला ” बाबा चा पाईक म्हणून पुन्हा गळाभेट देऊन ,उद्याच्या धुणे -भांड्याचे आमंत्रण देतील, आणि काँलर ताईट करून पुन्हा एकदा “जोहार, माय -बाप, होईल, अनं दिवस भर भीमगीते ऐकून भरलेलं मन सांज होताच “बियर-बार अनं हातभट्टी अड्यावर जयभीमची आरोळी ठोकत गल्ली बोळातून झुलत, गाणी गात “मनुवादी “ढाळजात बायलीला धाडून अनं स्वाभिमान गाडुन पुन्हा गडी ताईट होईल!!!
मंत्री, संत्री, नेते, पुढारी योजना सांगतील, दलित वस्तीचा निधी सांगतील , बाबाच्या त्यागाचे अश्रू गाळतील अनं गावाच्या ओढ्यात तरण्या, बांड, दलित माय -बहिणीचा सामुहिक “बलात्कार “होईल!!
मग होईल पोलिस केस, अँट्राँसिटी, चौकशी, कोर्ट कचेरी, अनं नेता मात्र सगळे “मँनेज ” करून आपल्याच बांडगुळाला खरेदी करून, डॉ, बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणेल, अन शोषण झालेली अबला मात्र सारया गावची “मुरूळी “होऊन आयुष्य भर “सेवा ” करेल लिंग पिसाट हैवानांची ।।
पुन्हा पुरोगामी महाराष्ट्र,छत्रपती,फुले,शाहु,
आंबेडकरांचा महाराष्ट्र सांगुन मनुवादी मात्र माज करतील अनं पुढच्या निवडणुकी पर्यत “सारे बहुजन गाभण,,,,,!!! अनं माझा भीमसैनिक वर्षभर “निळी नेमाटी
लावून मनुवाद्याच्या गाडीचा “बैल” होऊन पुन्हा 14एप्रिल साठी नव्या जोमाने “जयभीम, जयभीम करत आयुष्य भर विखरून गटा, तटात, 6डिसेंबरला मात्र नतमस्तक होईल, बापा पुढे, लाचार, भडवा,,,अनं गद्दार !!!
———–लेखक, संतोष कांबळे, (विद्रोही लेखक, संपादक, पत्रकार, 8999180009)//

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!