
आज लोकसभेत महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी बहिणीचं कल्याण बघेल, असा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असं वक्तव्य केले.
महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावला. महिलांबाबत महिलांनीच बोलाव, असे नसते भावांना देखील बहिणीची काळजी असते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याची चर्चा आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमित शहा बोलले पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येक बहीण इतकी नशीबवान नसते.
महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला. आज महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे पण महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्ष यांनी मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला होता. यावर भाजपने उत्तर द्यायला हवे. भाजपचे लोक वैयक्तिक महिलांवर टीका करतात, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला
महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला. आज महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे पण महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्ष यांनी मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला होता. यावर भाजपने उत्तर द्यायला हवे. भाजपचे लोक वैयक्तिक महिलांवर टीका करतात, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत