एक्झिट पोल्स निव्वळ अंदाज असतात, फार मनावर घेवू नका त्यात 360 डिग्री बदल शक्य आहेत.
एक्झिट पोल्सचा अंदाज तंतोतत अचूक ठरत नाही.काही वेळा एक्झिट पोल्सचे अंदाज हे प्रत्यक्ष निकालाच्या अगदी विरुद्ध असल्याचंही सिद्ध झालं आहे.सामान्यपणे एक्झिट पोल्सचे अंदाज हे मतदान करून आलेल्या लोकांच्या कलांवर अवलंबून असतात.
विधानसभा निवडणूक एक्झिट पोलमधून विविध संस्थांनी पाहणी केलेल्या संस्थांचा निष्कर्षातून सरकार कोणाचे येऊ शकते? यासंदर्भात कल जाहीर केले जातात.परंतु भारतातील एक्झिट पोलचा इतिहास पहिल्यास अनेक वेळा एक्झिट पोल फेल ठरले आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये मतदानानंतर एक्झिट पोल केला जातो.अमेरिका, दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया, युरोपसह अनेक देशांमध्ये एक्झिट पोल केले जातात. एक्झिट पोलची सुरुवात करण्याचे श्रेय अमेरिकेकडे जाते. १९३६ मध्ये सर्वात प्रथम अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रेबिंसन यांनी निवडणूक सर्व्हे केला होता. त्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी फ्रँकविल डी रुजवेल्ट यांचा विजय होणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. प्रत्यक्षात निकालही तसाच आला. अमेरिकेपासून सुरु झालेला एक्झिट पोल भारतात येण्यास अनेक वर्ष लागली. भारतात १९८० आणि १९८४ मध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रणव रॉय यांनी सर्व्हे केला होता. परंतु तो एक्झिट पोल म्हणता येणार नाही. तो एक सर्व्हे होता. त्यानंतर १९९६ मध्ये सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) ने एक्झिट पोल केला. त्यावेळी प्रसिद्ध पत्रकार नलिनी सिंह यांनी दूरदर्शनसाठी एक्झिट पोल केला होता. त्या पोलमध्ये भाजप लोकसभा निवडणूक जिंकणार असा निष्कर्ष काढला गेला आणि प्रत्यक्षात भाजपचे सरकार आले. १९९८ मध्ये खासगी वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसारीत करण्यास सुरुवात केली. देशातील प्रमुख संस्था सी-व्होटर, चाणक्य, एक्सिस माय इंडिया, पोल स्ट्रॅट आणि जन की बात यासारख्या संस्था एक्झिट पोल करतात.
लोकसभा निवडणूक २००४ मध्ये भाजपने ‘इंडिया शाइनिंग’ची घोषणा देत निवडणूक लढवली होती. त्यावेळी सर्व एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार येण्याचा पोल दिला होता. परंतु एनडीएला २०० जागांवर विजय मिळवता आला नाही. त्यावेळी जवळपास सर्वच एक्झिट पोल फेल ठरले. मग २२२ जागा मिळवणाऱ्या युपीएने समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाला सोबत घेऊन सरकार बनवले होते.
लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल फेल ठरले. त्यावेळी युपीएला १९९ तर एनडीएला १९७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात युपीएला २६२ तर एनडीएला १५९ जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे सरकार आले. या निवडणुकीत एक्झिट पोल फेल ठरले.
लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत एक्झिट पोल फेल ठरले. या निवडणुकीत सर्वच एक्झिट पोलने भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा निष्कर्ष काढला होता. परंतु भाजपची घोडदौड २४० जागांवर थांबली. या निवडणुकीत भाजपला नव्हे तर एनडीएला बहुमत मिळाले. एनडीएला २९३ जागा मिळाल्या.त्यामुळे एक्झिट पोल खरे असतात असे नाही.कारण पोल करना-या संस्थांकडे एक्झिट पोलचे निष्कर्ष काढण्यासाठी खूप कमी वेळ असतो.त्यांना देशातील प्रत्येक भागातील वेगवेगळ्या समुदायाची आकडेवारी मिळत नाही.त्यामुळे मोजक्या लोकांना प्रश्न विचारुन निष्कर्ष काढले जातात.वेळेची कमतरता हा एक्झिट पोल अपयशी ठरण्याचे सर्वात मोठे कारण आहे.एक्झिट पोलचा नियमानुसार एकूण मतदारापैकी एक टक्का मतदारांची पाहणी करावी लागते.त्यात लिंग आणि जातीकडे लक्ष ठेवले पाहिजे. परंतु त्या नियमाचे पालन सर्व्हे करणाऱ्या संस्था करत नाही. त्यामुळे एक्झिट पोल फेल होतात.एक्झिट पोल करणारी संस्था डेमोग्रॉफी म्हणजे विविधता, सामाजिक सांस्कृतिक आणि अस्थिरता यावर लक्ष देत नाही. यामुळे एक्झिट पोल फेल ठरतात.
अनेक संस्था वॉर रुममध्ये म्हणजे कार्यालयात एक्झिट पोल करतात.मग त्याची पडताळणी करण्यासाठी स्थानिक लोकांशी चर्चा करतात.
सबब महापोल, एक्झिट पोल, पोल पत्रकारांचा, महायुद्ध २०२४, पोल ऑफ पोल्स, एक्झिट पोलचा कौल कुणाला, पोल डायरी, महा AI Exit पोल, मतदानोत्तर चाचणी, वगैरे मनोरंजन म्हणून पहा… दोन दिवस वेळ आहे.घोडा मैदान जवळ आहे.
राजेंद्र पातोडे
9422160101
विधानसभा२०२४
एक्झिट_पोल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत