देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
THE Mahar :Who were they and How they became Untouchables?
माहार नाव कसे पडले?
मा जी न्यायाधीश अनिल वैद्य
हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेला निबंध आहे तो डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 17(2)पान 137 ते 150
वर आहे
यात त्यांनी माहार हे नाव मृत आहार करण्यावरून पडले ही डॉ भंडारकर यांचे मत मान्य केले .माहार नावावरून महाराष्ट्र हे नाव पडले ही बाब डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली.
*माहार नावा बाबत पुढे
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
१३ ऑक्टोबर, १९३५ रोजी येवला, ता. नाशिक येथे *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की, 'ज्या धर्मात मी जन्मलो त्या धर्मात मी मरणार नाही.'* पुढे धर्मांतराच्या वेळेस *डॉ. बाबासाहेब म्हणाले, 'मनुष्य मात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो.' हे वाक्य उच्चारताना त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पुढे ते म्हणाले, 'मला इतका आनंद झाला आहे की, मी नरकातून सुटलो, असे मला वाटते.'*
३१ मे, १९३६ रोजी महार इलाखा परिषद मुंबई येथे *डॉ. बाबासाहेब म्हणाले, 'महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून महार जातीमध्ये स्वाभिमान जागृत होण्यास सुरुवात झाली. 'महार' या जाती नावामुळे आपल्याला हीन लेखतात, ही जाणीव झाल्यामुळे समाजातील काही लोक स्वत:ची जात 'चोखामेळा' किंवा 'हरिजन' असे सांगू लागले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले, 'जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल, तोपर्यंत तुम्हाला या नामांतरापासून काही अर्थ नाही. ख्रिस्ती म्हणवून घेणे, बौद्ध म्हणवून घेणे, शीख म्हणवून घेणे हे धर्मांतर आहेच, पण नामांतरही आहे. ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गंधी नाही. हे नामांतर आमूलाग्र आहे. चोखामेळा, हरिजन याला जुन्या नावाची घाण लागल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतरापासून काही अर्थ नाही. नावाला नामांतर करावेच लागेल. कारण हिंदू म्हणवून चालणार नाही. कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कोणी जवळ येणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज हे नाव, उद्या ते नाव, असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये, असा माझा प्रश्न आहे.*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणावरुन धर्मांतरामागचा महत्त्वाचा उद्देश स्पष्ट होतो की, धर्मांतरामुळे जातीचे नाव महार, मांग, चर्मकार इत्यादी नष्ट होईल. ज्यामुळे अस्पृश्यांना कुणी तुच्छ लेखणार नाही.
३१ मे, १९३७ रोजी कुर्डूवाडी, जि.सोलापूर येथे महार व मातंग समाजाच्या लोकांसमोर *डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "महार किंवा मांग या नावात काय आहे की, त्यात तुम्हाला अभिमान वाटावा? या नावाने असा कोणता ज्जवल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो की, जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे? सर्व समाज या नावाला तुच्छ लेखीत आहे. तुम्हाला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही.* तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोन्ही समाज एका वरवंट्याखाली चिरडले जात आहेत, हे जाणले पाहिजे."
यावरून हे स्पष्ट होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार किंवा मांग या पूर्वाश्रमीच्या जातीच्या नावाचा अभिमान बाळगणे चुकीचे आहे, हे सांगितले. या नावांना इतर समाज तुच्छ लेखतो. कचऱ्याचीदेखील किंमत नाही, असा स्पष्ट उपदेश त्यांनी केला.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे हिदूंचा व अस्पृश्यांचा काही संबंध नाही. अस्पृश्य हा हिंदूंपासून वेगळा गट आहे. ३१ मे, १९३६ च्या मुंबई इलाखा महार परिषदेच्या भाषणात ते म्हणाले, "हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून ती त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती. म्हणून त्यांना त्या गुलामगिरीविरुद्ध बंड करता आले नाही व गुलामगिरीतच राहावे लागे. या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेतली पाहिजे."*
*"आम्ही हिंदू समाजात हीन गणले गेलो आहोत. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तुणुकीमुळे आम्ही सर्व या देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहे. ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता, हा कलंक धुवून काढण्याकरिता, नरदेहाचे चीज करण्याकरिता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे व तो म्हणजे हिंदू धर्माचा व हिंदू समाजाचा त्याग करणे होय*. (३१ मे, १९३६ मुंबईचे भाषण) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणातील हिंदू धर्म व हिंदू समाजाचा त्याग करा या वाक्याचा ढोबळमानाने विचार केला तर हिंदू धर्म व समाज महार जातीचा त्याग करा, म्हणजेच ते सोडून द्या, असाच अर्थ आहे.
१३ ऑक्टोबर, १९३५ रोजी येवला, ता. नाशिक येथे *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की, 'ज्या धर्मात मी जन्मलो त्या धर्मात मी मरणार नाही.'* पुढे धर्मांतराच्या वेळेस *डॉ. बाबासाहेब म्हणाले, 'मनुष्य मात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो.' हे वाक्य उच्चारताना त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पुढे ते म्हणाले, 'मला इतका आनंद झाला आहे की, मी नरकातून सुटलो, असे मला वाटते.'*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणावरुन धर्मांतरामागचा महत्त्वाचा उद्देश स्पष्ट होतो की, धर्मांतरामुळे जातीचे नाव महार, मांग, चर्मकार इत्यादी नष्ट होईल. ज्यामुळे अस्पृश्यांना कुणी तुच्छ लेखणार नाही.
* तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोन्ही समाज एका वरवंट्याखाली चिरडले जात आहेत, हे जाणले पाहिजे."
यावरून हे स्पष्ट होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार किंवा मांग या पूर्वाश्रमीच्या जातीच्या नावाचा अभिमान बाळगणे चुकीचे आहे, हे सांगितले. या नावांना इतर समाज तुच्छ लेखतो. कचऱ्याचीदेखील किंमत नाही, असा स्पष्ट उपदेश त्यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत