निवडणूक रणसंग्राम 2024भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडणुकीचा बाजार व लोकशाही

आठवडी बाजार भरतो,त्यात रस्त्यावर अनेक किरकोळ विक्रेते जीवनोपयोगी वस्तू घेऊन विकण्यासाठी बसलेले असतात.ते ग्राहकाची वाट पाहत असतात,दिवसभर.दिवस मावळतीला जसा जसा येईल तसा आपल्या मालाची किंमत कमी करत करत शेवटी जेव्हड्याला विकेल तेव्हड्यात देवून मोकळे होतात.काही विक्रेते तर आता हे ओझ परत घरी कशाला नेऊ म्हणून दान करतात.तर काही विक्रेते पैसे दिल्या शिवाय आपली वस्तू विकतच नाहीत.तसेच परत घेऊन जातात.अनेक विक्रेत्यांची मानसिकता अलग अलग असते.परंतु या आठवडी बाजारात विक्रेता आणि ग्राहक असतातच.म्हणून तर यास बाजार म्हणतात.असेच काहीसे निवडणूक आणि लोकशाहीचे चित्र आहे.आजकाल निवडणूक म्हणजे लोकशाहीचे चित्र आणि चरित्र नसून ही निवडणूक म्हणजे हुकुमशाही चे चित्र आणि विकृत चारित्र्य झाले आहे.मतदानाचे पावित्र्य हरवले आहे,ते विकल्या जात आहे,पावित्र्य जेंव्हा विकल्या जाते,तेंव्हा ते पुण्य नसून पाप बनते.त्यामुळे विकणाराही पापी आणि घेणार पण पापीच होतो.आणि यातून पापी लोकशाही जन्मास येते.याचा अर्थ ती हुकुमशाही असते.हुकूमशाही यातून जन्मास येते.जी पापी असते.ती मानवी हक्क हिरावून घेते,म्हणून ती पापी असते.
निवडणुकीच्या या बाजारात गरिबांना सारे मोफत देण्याचे आमिष दाखवून राजकरते त्यांना भिकारी बनवतात.गरीब मतदार फुकटच्या योजनांद्वारे तो परावलंबी बनतो,लाचार बनतो.दुसऱ्याने द्यावे तर त्याचा संसार चालवा,नाहीतर उपाशीच राहावे,अशी त्याची अवस्था होते,यातून तो आत्मविश्वास गमावून बसतो,त्यामुळे तो गुलाम बनतो.स्वकर्तुत्वाने कमावून खाण्याची त्याची हिम्मत गळून पडते.
निवडणुकीच्या या बाजारामुळे मध्यम वर्गीय माणसाला श्रीमंत बनण्याची आशा दाखविल्या जाते,छोट्या व्यापाऱ्यांना,छोट्या उद्योगपतींना मोठे कर्ज देण्याचे आणि ते बुडउन टाकण्याचे आमिष दाखविल्या जाते.छोटे मोठे शेतकरी यांना पण असेच कर्जाचे आमिष दाखवून मते खरेदी केली जातात.कर्मचाऱ्यांना बढती चे पगार वाढीचा वायदा केल्या जातो,आश्वासने देऊन त्यांची मते विकत घेतात.भांडवलदार मोठे कारखानदार ,शेटजी भटजी धर्माचे मठाधिपती महाराज यांची युती होते, साटे लोटे होते यातून मतदानाचा व्यवहार बाझार होतो,याचा फायदा हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक प्रतिनिधींना होतो.अशा बाजारू लोकशाही तूनच हुकूमशाही जन्मास येते.अशा बाजारू लोकशाही स भांडवली लोकशाही म्हणतात.आजची लोकशाही ही निर्मळ,निर्भेळ,स्वच्छ,पवित्र लोकशाही नसून ही गढूळ अपवित्र झाली आहे.यामुळे लोकशाहीला हुकुमशाहीच धोका निर्माण झाला आहे.संविधान हे लोकशाहीचे अस्ले तरी याच लोकशाही संविधानाच्या आधारेच हुकुमशाही आणण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे चालू आहेत.हे मतदार जो पर्यंत समजून घेणार नाहीत,तोपर्यंत हुकूमशाही चोर पावलांनी येणारच आहे.आणि एकदा का हुकुमशाही या देशात आली ,की मग मतदार नागरिक परत गुलाम होणार.हा मतदार नागरिक राहणार नाही.यास मतदानाचा अधिकार राहणार नाही.1947 ले राजकीय स्वातंत्र्य मिळाले.अजून सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य समता मिळायची आहे,बंधुता निर्माण करायची आहे,हे या संविधानाच्या आधारे मिळवणे चालू आहे,अशांत असा निवडणुकीचा बाजार सुरू झाला तर सामाजिक आर्थिक समता येणे किंवा आणणे शक्यच नाही.अशी समता लोकशाहीच्या मार्गानेच आणता येते. हुकूमशाही चे मार्गाने स्वातंत्र्य समता न्याय शक्य होत नाही.याचा विचार येथील धार्मिक कार्यकर्ते,सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते,पत्रकार,मीडिया,विचारवंत,साहित्यिक,कलाकार यांनी केला पाहिजे तरच निवडणुकीचा बाझार बंद होईल,अन्यथा बसा सारेच हात चोळीत,येणाऱ्या हुकूमशाही त.
बदल घडवायचा असेल तर पैश्याचा विचार न करता लोकशाहीवादी पक्ष कोणते ? आणि हुकुमशाही वादी पक्ष कोणते ,,? याचा आधी अभ्यास करून ,जे लोकशाहीवादी पक्ष आहेत,ज्यांचा संविधान वर विश्वास आहे,आणि ज्यांचा संविधानानुसार विश्वास आहे,लोकशाहीवादी असूनही ते बिकाऊ असतील,ते धोकेबाज समजावेत,आणि ते जर हुकूमशाहीवादी पक्षांशी युती करत असतील किंवा त्यांना मदत होईल असे निर्णय घेत असतील,किंवा त्यांच्या कृतीने हुकूमशाही ले बल मिळणार असेल तर अशा पक्षांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर केले पाहिजे.असे घडले तरच लोकशाही टि केलं.अन्यथा हुकुमशाही तर बासिंग बांधून तय्याराच आहे, बहुल्या वर चढायला.कारण उद्या लग्न आहे ना? आठवडी बाजार नाही.
लेखक : दत्ता तुमवाड.सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक:२४ ऑक्टबर 2024.फोन: 9420912209.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!