बुद्धांची शिकवण
१) मूर्खांची संगती करु नका.
२) विद्वानांची संगती करा.
३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
४) अनुकूल देशात निवास करा.
५) चांगली कामे करा.
६) चित्तास स्थिर ठेवा.
७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
८) विद्वान व्हा.
९) संयमी राहा.
१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
११) मातापित्याची सेवा करा.
१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
१४) दानधर्म करा.
१५) धम्माचरण करा.
१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
१७) निर्दोष कर्मे करा.
१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
२१) गौरवाची भावना जोपासा.
२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
२३) क्षमाशील असा.
२४) संतुष्ट असा.
२५) कृतज्ञ असा. लीन असा.
२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
२९) ब्रम्हचारी राहा.
३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा. (देहदंड नव्हे)
३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ ठेवा.
– नमो बुद्धाय-जय भीम –
💐💐💐💐🙏🙏🙏
।।पंचशील।।
1⃣ मी जीव हिंसे पासून अलिप्त राहाण्याची शपथ घेतो.
2⃣ मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
3⃣ मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो.
4⃣ मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो.
5⃣ मी मद्य,मादक पदार्थ तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔵 चार आर्य सत्य🔵
1⃣ दुःख :
मानवी जीवनात विविध स्वरुपात दुःख अस्तित्वात असते.
2⃣ दुःख समुदाय :
दुःख तीव्र इच्छा व तृष्णेपासून निर्माण होते.
3⃣ दुःख निरोध :
तीव्र इच्छा व तृष्णेला समूळ नष्ट करुन दुःखापासून मुक्तता होवू शकते.
4⃣ दुःख निरोधगामिनी प्रतिपदा :
दुःख मुक्तिचा मार्ग आहे. तो मार्ग आहे बुद्धांनी मार्गदर्शीत केलेला आर्य अष्टांगिक मार्ग.
↔↔↔↔↔↔↔↔🔶 आर्य अष्टांगिक मार्ग
(सदाचाराचा मार्ग)
1⃣सम्यक दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
2⃣सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
3⃣सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे.
4⃣सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
5⃣सम्यक आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
▶सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
7⃣सम्यक स्मृती :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास ( मनाला) जागृत ठेवणे.
8⃣सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे।
▶▶▶▶▶▶▶▶
🔴दहा पारमिता🔴
(शील मार्ग)
1) शील :- शील म्हणजे नीतिमत्ता,वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
2) दान :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता,रक्त, देह अर्पण करणे.
3)उपेक्षा :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
4) नैष्क्रम्य :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
5)वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
6) शांती :- शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
7) सत्य :- सत्य म्हणजे खरे,माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
8) अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
9) करुणा :- सर्व प्राणी, मानवाविषयीची प्रेम मैत्रीपूर्ण दयाशीलता.
10) मैत्री :- मैत्री म्हणजे सर्व प्राणी,मित्र,शत्रूविषयी देखील नव्हे तर सर्व जीवनमात्राविषयी बंधुभाव बाळगणे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
जर आपण या बौद्ध तत्वांचा, शिकवणुकीचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले अस्तित्व असताना नक्कीच आपण दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो व जीवंतपणीच
मुक्ति प्राप्त करु शकतो.
सबका मंगल हो…… 🙏🙏🙏
धम्म संदेश प्रसारक
भदन्त महानाम पचवर्गीय मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत