दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

तुम्ही मला पाडलंत ……मी तुम्हाला निवडणुकीत पाडणार …..!

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे मनोगत.*

*” तुम्ही जनतेला फसवता…..*

फसवता……..
शेवटी मलाही सोडलं नाही….!
तुम्ही ( असंविधानिक केंद्र व राज्य सरकार माझ्या नावानी सरकार चालवीणारे महाराष्ट्र सरकार जे, गुवाहाटी व्हाया सुरत वरून खंजीर खुपसून निर्माण झाले ) केवळ पैसा खाणारे भ्रष्टाचारीच नसून नितिभ्रष्टाचारी आहात. हे आज सिद्ध झाले आहे. आजपर्यंत तुम्ही केवळ रस्ते, पूल, धरण, पाटबंधारे प्रकल्प, सिंचन प्रकल्प इमारती, सुशोभीकरण, इत्यादी प्रकल्पाच्या खोट्या विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केलात. 100% बजेट मधून 50 ते 60% रक्कम शिपायापासून ते कारकून, वरिष्ठ कारकून, अकौंटंट, कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, सनदी अधिकारी, सचिव, मुख्यसचिव, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री प्रधानमंत्री इत्यादी सर्वच जबाबदार व्यक्ती आणि व्यक्ती समूहात एवढी रक्कम वाटल्यानंतर उरलेल्या 40ते 50% बजेटमध्ये प्रकल्प पूर्ण करून कॉन्ट्रॅक्टर आपला नफा शोधतो…….
अशाने तुम्ही सर्व खोटा विकास तर केलाच. आणि यामुळे निर्माण होणाऱ्या महागाई, बेरोजगारिला जनतेच्या माथी मारून तुम्ही त्यांना बेघर तर तर केलेच शिवाय जगता – जगता मरण्याची व मरता – मरता जगण्याची दयनीय अवस्था त्यांची तुम्ही केली. त्याला केवळ गेल्या 70 वर्षात तुम्हीच जबाबदार आहात………!
अरे मी तलवारीच्या प्रसंगी कौशल्याच्या गनिमी काव्याच्या बळावर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी जाती व धर्माच्या पलीकडे जाऊन………

     *🌹सम्राट अशोकानंतर🌹* 

मी प्रयत्न केले…..!
याची सुद्धा तुम्ही जाणीव नाही ठेवली.
ज्या….

*🌹डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹*

 *यांनी माझ्या तलवारीच्या टोकाने जी लोकशाही मूल्ये मी रुजविण्यास सुरुवात केली. त्यानी त्यांच्या लेखणीच्या टोकाने संविधान निर्माण करून तुमच्यातील कूट नितीला कायमचे फेकून देण्यासाठी प्रयत्न केला. त्याच कूटनीती विरोधात मी आजन्म लढलो. प्रसंगी त्यांच्याही विरोधात मी तलवार उपसली. ही कूट नीती केवळ माझ्या राज्याभिषेकाच्या वेळीच आडवी आली असे नव्हे तर, ती माझ्या सग्या सोयऱ्यात सुद्धा होती. त्यांनाही न जुमानता मी खंबीर होतो.....!*
   *आणि तुम्ही तर त्याच कुटनीतीचा वापर करून माझा पुतळा उभारला......*
     *जो 26 वर्षे वयाचा गणपतीच्या मूर्त्या बनविणारा जयदीप आपटे  खोटा शिल्पकार त्याला तुम्ही माझा पुतळा उभारण्यासाठी 26 लाख रुपये दिलेत. कोणता अनुभव पाहुन...?*

केवळ कल्याणचा आहे म्हणून…..
या माझ्या स्मारकासाठी 38 कोटी रुपये माझ्या रयतेच्या कष्टाच्या, घामाच्या पैश्यातून तुम्ही खर्च केले. 12 फुट उंचीचीच परवानगी असतांना तुम्ही 33 फुट उंच पुतळा कसा बसवला….?
तुम्हांला नौदलाने यासाठी पॆसे दिले, त्यातही भ्रष्टाचार केलात. तुमच्या बांधकाम विभागाला केवळ तो उभारण्याचे काम होते. ते सुद्धा तुम्ही नैतिकतेने माझ्यावरील खोट्या नाट्या श्रध्देने सुद्धा करू शकला नाहीत. त्यातही नितिभ्रष्टता दाखवली……….!
पुन्हा वर तोंड करून सांगता की, ” ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे होते, पुतळा समुद्र किनारी होता, पाऊस जोराचा होता, वादळी वारा होता……. “
अरे समुद्रकिनारी असलेली नारळाच्या झाडाची नारळं पडली नाहीत, 80 वर्षांपूर्वीचा माझाच पुतळा इतर ठिकाणचा पडला नाही. हाच कसा पडला….???

*तुम्ही मला नितिभ्रष्टाचारी होऊन पाडलत ना.......*
    *मी तुम्हाला माझ्या जनतेला सांगुन येत्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाडणार..!!!!!*

       *------ पुतळ्याच्या अवशेषाचे मनोगत*

जागृतीचा लेखक :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!