आरोग्यविषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

गुड टच,बॅड टच

प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे

    आज जगात तिसरी शक्ती म्हणून माध्यमांच्या माध्यमातून आपण  उदयास येतांना दिसतो आहोत.हे होत असतांना समोर येणार्या वेगवेगळ्या समस्यावर मार्ग ही काढण्याचा आपण प्रयत्न करतोय.तरी ही गुड टच,बॅड टच हे शब्द आता नवीनच ऐकावयास मिळू लागलेले आहेत.घडलेल्या दुर्दैवी घटना मधून हे समोर येत आहे.मुलांना-मुलींना,विशेषत: मुलींना हे शिकवावे लागणार आहे व सावध करावे लागणार आहे.

            अलिकडे लोक खूप जागृत झालेत. बाल अत्याचाराच्या घटना भारत मातेच्या उरात किती लपल्या,दडविल्या आहेत या आता  बाहेर येतांना दिसत आहेत.मणिपुर, कोलकता,डेहराडून, बदलापूर अशा कितीतरी गावा गावात घडत असतात.घडलेल्या आहेत. पण कोलकता,बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर चारी बाजूंचा आक्रोश समोर येतांना  दिसतोय.पण अत्याचार, बलात्कार अशा घटना घडून गेल्यानंतर कुठे तरी आपण जागे होत आहोत व आता गुड टच,बॅड टच सारखे शब्द समोर आले. आम्ही आता त्याच्यावर विचार करू लागलो आहोत.पण इतरांच्या पेक्षा  स्वत:च्या कुटूंबातील सदस्यावर असे प्रसंग  ओढवले तर तीव्रता समजते.                निव्वळआठवड्याभरातील आकडेवारी पाहिली तरी भोवळ येऊन चक्रावल्या सारखे वाटते.नेमके काय चाललेले आहे.आपण कुठे चाललो आहोत, हे समजनासे झाले आहे.नेहमी घरोघरी वेगवेगळ्या आराध्यांची आपण पूजा करतो,प्रार्थना करतो.कुठे मंदिर दिसले तरी हात जोडून, नमस्कार करून पुढे जातो. मला सुखी ठेव, सर्वांना सुखी ठेव. असं अंतर्मनात म्हणत असतो.आज कमीत कमी दुसरी पासून पुढे सर्वांचे शिक्षण झालेले आहे.त्यामाध्यमातून एक संस्कारशील शिक्षण घेतलेले असते. "ऑल इंडिया इज माय कंट्री,ॲन्डऑल इंडियन्स आर  माय ब्रदर्स ॲन्ड सिस्टर्स "अशी प्रतिज्ञा  घेतो.तरी  सुद्धा  इतरांची मुलगी,बहिण ही इतरांचीच  राहते व बाल अत्याचारा सारख्या  घटना घडत आहेत. मग नेमके कुठे चुकते? काय प्रतिज्ञा करतो ? काय वागतो ?काय करावयास हवे? यामुळे  सरकार व समाजातील घटक,सामाजिक मंडळे,महिला मंडळे जागृत होतात. पोलीस यंत्रणेवर ही खूप तान ओढवला जातो.यासाठी लहान मुली,तरूण मुली, कर्मचारी महिला यांनी पहिल्यापासूनच सावधान रहायला हवे.तथास्तु संबंध ठेवायला हवेत.  

     यांत्रिकीकरणच्या,टेक्निकल  च्या  आजच्या या जमान्यात प्रत्येकजण धावपळीत आहे.मशीनप्रमाणे प्रत्येकाचे काम सुरू आहे.वेळेची मर्यादा, पति-पत्नी नोकरी करणारे,बिजनेस- व्यवसाय,अमर्यादीत गरजांच्या पूर्ततेसाठी करावी लागणारी धावपळ  यामुळे स्वत:च्या काळजाच्या टुकड्याला सुद्धा शाळेत सोडायला, आणायला वेगळी व्यवस्थाकरावी लागत आहे. बारा ला शाळा सुटली तर काही लोकांनी मुले सांभाळण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. शाळेच्या वेळेपर्यंत सुद्धा मुलांना सांभाळणार्या आया आहेत.अशातूनच कोणाची तरी जाता येता ओळख होते. ने आण करणाऱ्यांच्या कडून इत्यंभूत माहिती समोर जाते .लहान मुलांना आई-वडीलांकडून मिळणारे प्रेम,माया ही अपुरे मिळते. त्यांचे बालपणातील हास्य ही गायब होते.मग जवळचे ओळखीचे कोणीतरी जिव्हाळा लावते.येता -जाता प्रेम दाखविते, माया दाखविते .पण त्याच्या मनात ही  अशी वाईट भावना येत नसते.परंतु हळू हळू इतकी जवळीकता वाढते गुड टच वात्सल्यापोटी होतो. पण हळू हळू गाल,ओठ,डोक्यावरून,केसातून प्रेमाने फिरणारे हात, स्पर्श, हास्य यामधून बॅड टच कडे ओढ निर्माण होते. .त्यातच वेळो वेळी प्रेमा पोटी दिलेली चाॅकलेट, बिस्कीट चा मोह लहानांना जडतो. ती त्या भावनेपासून खूप दूर असतात. लहान असल्यामुळे शाळेत ने - आण करतांना, इकडे तिकडे खुल्या भावनेतून येतांना  जातांना,फिरतांना  समाजातील घटकांना ही शंका येण्याचा संबध नसतो.व त्या लहानग्यांची भावना जागृत नसते.पण गुड टच चे रूपांतर ठरवून नव्हे. तर अनावधानाने बॅड टच कडे घेऊन जाते. बॅड टच आतून जागृत होऊ लावल्यानंतर सदर व्यक्ती जवळीकता  साधत राहते.

          लहानांना नेहमी खाऊ मिळतो,दहा पंधरा रूपये  कधीतरी मिळतात म्हणून ती ओढली.त्यांच्या  सोबत इकडे तिकडे जातात.मात्र या व्यक्तीतील ती भयानक हव्यास पूर्ततेसाठी ची  शक्ती चे रूपांतर त्या जनावरात होते.मग काही केल्याने न थांबता कुठेतरी आडबाजूला हे चुकीचे कृत्य बुद्धिमान माणूस असून सुद्धा घडते. बालक घाबरते त्याला काय घडतंय यातलं काहीच समजत नाही.घडे पर्यंत यातला माणूस अदृश्य तो आतील सैतान जागृत होतो.व घडून गेल्यानंतर माणूस भानावर येतो,जागृत होतो.मग आता काय करायचे, या लहानग्यांने ही गोष्टही  घरात सांगीतली तर काय होईल.त्यातच त्याचे रडणे, शरीरावरील अतिशयोक्तीपूर्ण ओरखडे यातून उत्तरे द्यावी लागणार, मम्मी-पप्पा या काका,मामा,चाच्या,दाद्या ने हे केले.मग काय होणार या भीतीपोटी आतील तो खूनी अत्याचारी जागृत होतो आणि गळा दाबतो. जीव घेतो.हत्या करतो. विल्हेवाट  लावतो.एका चांगल्या नात्याला काळीमा फासतो व पळून जातो.चार आठ दिवस दिसेनासा होतो.पण यातूनच शंका वाढते.अशावेळी पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला जातो.पण तिथे ही ताबोडतोब शोध मोहीम सुरू होईल असे नसते.कारण त्यांच्या काही शोधाच्या पद्धती असतात. त्याप्रमाणे ते प्रयत्न करतात.तीव्रता पाहून प्रसंगी दाद मिळते.मिळत ही नाही. हे मात्र सत्य.कदाचित म्हणूनच लोक बोलत असावेत पोलीस स्टेशन आणि न्यायालयाचा दरवाजा कधी  चढू नये.

यासाठी पालकांनी इतरांच्या विश्वासावर राहू नये. म्हणजेच त्या मुलां-मुलीचा सख्खा भाऊ किंवा बहीण सोडली तर अन्य कोणावर ही किती विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवावे.तरूण मुलींना ही इतरांच्या सोबत शाळा,काॅलेज,मार्केट,हॉस्पिटल, सहल अशा ठिकाणी पाठवितांना प्रत्येक वेळी सावध असले पाहिजे .कारण सर्व साधारण पणे सहावी सातवी पासून मुली वयात येतात. यातूनच जाता येता गुड टच बॅड टच सुरू होतात. आणि एकमेकाकडे आकर्षिली जातात मग आड असलेले वयाचे बंधन तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यातच वाढती महागाई, वाढत्या बाजारपेठा, नव-नवीन वस्तूंचा मोह ,सिनेमा, धारावाहिक यातून दाखविली जाणारी अंग विक्षेप नृत्ये, अर्ध नग्न कपड्यांच्या जाहिराती, मर्यादित, अपूर्ण पडणारा पैसा, संपर्कात येणारे लोक त्यांच्याकडून होणारी आर्थिक मदत,वाढदिवसानिमित्त मिळणार्या भेट,सतत ठराविक वाहनातून होणारा प्रवास ही एखाद्या विषयी, सम वयस्क भिन्न लिंगी शी वाढलेली जवळीकता मोह वाढवित विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो.याबाबत तरूण मुलींनी काळजी घेतली पाहिजे.फिरावयास जावयाचे मटले तरी आनंदापोटी,वाढदिवसानिमित्त बाहेर गेल्यानंतर घेत असणारी पेये.प्रवासात सोबत असणारी ओळखीची व्यक्ती ही मोह वाढवू शकते.म्हणून पालक,तरूण-तरूणी यांनी सावधानता वाढविली पाहिजे, वेळ पाळली पाहिजे,वेळेत घरी आले पाहिजे.सुरक्षित अंतर ठेवून जगत राहिलो तर अनर्थ टळू शकतात. कुठे. तरी रात्रीचा प्रवास कसा कमी होईल हे ही पहावे. कारण अनर्थ घडल्यानंतर किती ही मोर्चे काढले मेणबत्त्या पेटविल्या,पैसा दिला ,राजकारण घडविले तरीही गेलेली व्यक्ती परत येत नाही.म्हणून सर्वांनी जागृत असले पाहिजे.

      पोलीस दलात निर्भया पथके तयार आहेत.शासनाकडून परिपत्रके निघू लागली. प्राथमिक शाळा,माधमिक शाळा ,उच्चमाध्यमिक  शाळा यामधून विशेष समित्या स्थापन करून अशा प्रकारचे  अत्याचार कसे रोकता येतील,गुड टच,बॅड टच चे प्रशिक्षण द्यावे.ते समजून घ्यावे.समजून सांगावे.शाळेत जाणार्या मुलांना नेहमी पालकांनी एक कोड द्यावा.शाळा सुटतांना कोणी जवळचे न्यायला आले तर कोड नंबर विचारून  बरोबर असेल तरच त्यांच्या  सोबत जावे. तरच शाळांनी  मुलांमुलींना नेणार्या बरोबर सोडावे. काही बाबी यातील जरी शक्य असल्या तरी किचकट ही वाटतात.कोणी कोणाकडे तीस सेकंदापेक्षा अधिक वेळ पाहिले तरी गुन्हा ठरतो.शाळेमधून  गुन्ह्याचा प्रकार आणि शिक्षा, व शिक्षेसाठी असणारा कायदा मदतीसाठीचे नंबर यांचा उल्लेख याबाबत चे फलक असावेत. मुलींच्या शाळेत असणारे कर्मचारी, त्यांचे चारित्र्य यांची वेळोवेळी,तपासणी, पर्मनंट सेवकांची भर्ती म्हणजे कामावरील निष्ठा,काळजी वाढते. कामावर घेतांना स्टैम्प पेपरवर वर जबाबदारी लिहून घ्यावी.ड्रेस याबाबतीत दक्षता,मुलींच्या वसतीगृहात आई वडीला व्यतिरिक्त भेटावयास येणारी व्यक्ती,घरी नेण्यासाठी येणारी व्यक्ती ,सुट्टी साठी मुली घराशिवाय अन्यत्र जाणार नाहीत. घरी पोहचल्यानंतर आईच्या किंवा वडिलांच्याच फोनवरून घरी पोहचल्याबाबात चा फोन व्हावयास हवा.याबाबतची काळजी पालकांनी घेतली पाहिजे.संध्याकाळी घरी किती पर्यंत  पोहोचावे.याबाबतीत ही योग्य काळजी घ्यावी. संध्याकाळी रात्रपाळीवर असणार्या महिला व .सुरक्षा रक्षकांनी सुद्धा सर्वच बाबतीत सावध असले पाहिजे. असे सेवक निर्व्यसनी असावेत.सफाई कामगार, वाचमेन, यांच्या बाबतीतील दक्षता,मुलां- मुलींची जवळीकता. एक अंतर सोडून असावी.अशा बाबतीत शाळांच्या कडून काळजी घेतली तर पालकांनी ही सतर्क असले पाहिजे.नाहीतर कधी कधी  पालक शाळांना उलट प्रश्न विचारतात. पण मुल दिसनासे झाले की पहिली चौकशी शाळा,काॅलेज पासून सुरू होते. 

         आता  हे जे घडले ते बदलापूर मधील १३ ऑगस्ट ला घडलेल्या दोन चिमुकल्यांच्या अत्याचाराच्या घटना,नंतर पाहिले तर १५ ऑगस्ट ला पुणे या ठिकाणी बाल अत्याचार होण्याचा प्रसंग,२० ऑगस्ट ला अकोला येथे संस्काराचे शिक्षण देणार्या, शिक्षकांकडून मुलींचा विनयभंग,२० ऑगस्ट  लाच मुंबईत ठाण्यातील मतिमंद मुलीवरील अत्याचार, चांदीवलीतील चिमुकलीवर अत्याचार, लातूर मध्येसाडेचार वर्षाच्या मुलीवरील लैंगिक छेडछाड, २१ ऑगस्ट  ला नाशिक मध्ये साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुंबईत अपंग मुलीवर अत्याचार, खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग, पुणे या ठिकाणी अल्पवयीन तरूणीच्या मदतीने दोन मित्रांनी केलेला अत्याचार, २२ ऑगस्ट  ला कोल्हापूर या ठिकाणी दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार व हत्या व नागपूर मध्ये आठ वर्षाच्या मुलीवर शेजार्यानेच केला  अत्याचार अशा या घटना वाचनात आल्या नसत्या म्हणून  मुलां-मुलींनी गुड टच,बॅड टच  ची ओळख करून घेतली पाहिजे योग्य  वेळेत समजून घेऊन समज देऊन ही ऐकले नाही तर पोलीस स्टेशन चा दरवाजा खटा खटा वाजविला पाहिजे. तेथील दरवाजा ही योग्य वेळेत उघडला गेला  पाहिजे.तरच योग्य वेळेत जरब बसून अनर्थ टळेल. अन्यथा अशा घटना वाचनातून गायब होतीलच असे नाही. म्हणून सावधान होऊया ,सावध करूया, सावध राहूया. म्हणून पोलीस यंत्रणेकडून सुरक्षिततेसाठी  मिळालेल्या हेल्पलाइन  नंबरांचा वापर करून,महिला,मुली, बालके कशी सुरक्षित राहतील याचा विचार करावा. सर्व प्रकारची कायदेशीर हेल्पलाइन केंद्र सरकारने दिली आहे ती अशी

१) संकटग्रस्त महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक १०९१, जो २४ तास उपलब्ध आहे.
२) संकटात त्वरित मदतीसाठी १०९०,१०९१
३) घरगुती हिंसा १८१
४) पोलीस मदत १००,११२
५) महिला रेल्वे सुरक्षा १८२
६)चाइल्ड हेल्पलाइन १०९८
७) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग १४४३३
८) राष्ट्रीय महिला आयोग तक्रारीसाठी ९१-११- २६९४४८८०, ९१-११-२६९४४८८३
आपल्या सुरक्षेसाठी जगात अतिउत्तम असणारी आपली पोलीस यंत्रणा २४ तास जागृत राहणार आहे.यासाठी यंत्रणेचा गैर वापर न होता योग्य वापर करून सुरक्षित राहूया, सुरक्षित करूया. सर्वांनी संस्कारशील राहून जगूया, जगवूया. आपण सुरक्षित राहण्यासाठी योग्य काळजी घेऊ.आपल्या मुलां मुलींना सुरक्षित ठेवू. मुलां-मुलींनी बहिन -भाव,मित्र-मैत्रिण यांची नाती जोडली तरी विशेषत: मुलींनी एक काळजी घेतली पाहिजे. अति विश्वास बरा नव्हे.मोबाईल वरील चॅटिंग,मोहात पाडणारे फाॅरवर्ड मैसेज,पालकांना न सांगता शाळा, अभ्यास या बाबतीत बाहेर जातांना काळजी व सतत एक अंतर राखले तरीही अशा घटना पासून सुरक्षित राहता येते. म्हणून आपण व इतरांच्या ही मुलां-मुलींची सुरक्षितता ठेऊ.व संस्कारशील देश राज्य घडवू,बनवूया.

              प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे

स.गा.म.काॅलेज, कराड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!