निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

जळगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी एक पाऊल मागे; अर्ज भरण्या आधीच उमेदवारी मागे घेत असल्याचे प्रफुल्ल लोढा यांनी केले जाहीर.

जळगाव : लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वच पक्ष आपापल्या मतदार संघाचे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत.

जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी मात्र मतदार संघाचा अभ्यास करत वेगळाच निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांना मतदार संघातील परिस्थिती सांगत त्यांनी सत्य स्वीकारले आहे. आपण निवडून येणार नाही अशी जाणीव झाल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत असे त्यांनी जाहीर केले आह

अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली होती. मतदारसंघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नाही. त्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतल्याचं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे.

“कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतःच्या मनाने उमेदवारी मागे घेतली”, असं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असणार? याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!