निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पसार

शिर्डी : लोकसभा 2024 च्या तिन्ही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला आहे. दरम्यान लोकांचा कल संविधान वादी, लोकशाही पुरस्कर्ते उमेदवार व पक्षांकडे जास्त असल्याचे दिसून येते आहे. त्यातून आपण हरणार असल्याची जाणीव होऊन बिथरलेले कार्यकर्ते चुकीच्या मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत.

असाच प्रकार शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिसून आल. येत्या 20 मे रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडणार आहे. पण त्यापूर्वीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. संगमनेरनजीक त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. रस्त्यालगतच्या झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला व हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. हा हल्ला माझ्या एकटीवर नसून नेतृत्व करु पाहणाऱ्या प्रत्येक महिलेवर असल्याची प्रतिक्रिया उत्कर्षा रुपवते यांनी दिली आहे.  

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची दुहेरी वाटणारी लढत वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी ठरणार आहे. काँग्रेसने ठाकरे गटाला जागा सोडल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते या वंचितकडून मैदानात उतरल्या आहेत. उत्कर्षा रुपवते यांचा गावोगावी झंझावाती दौरा सुरु असून त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सोमवारी 6 मे रोजी अकोले तालुक्यात भेटीगाठी सुरु असताना रात्री अचानक उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्षा रुपवते यांना कोणतीही इजा झालेली नाही. पण त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता या प्रकरणाबद्दल उत्कर्षा रुपवते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या 25 वर्षांपासून मी प्रस्थापितांच्या विरोधात लढा देत आहे. आता मी निवडणूक लढवत असल्याने कुणी हा हल्ला घडवला हे जनतेला ठाऊक आहे. याचे रुपांतर मतपेटीत दिसेल”, असा विश्वास उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला आहे.  

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!