१९७ गाड्यांना झाला उशिर ; आपत्कालीन साखळी खेचण्यात आल्यामूळे

मध्य रेल्वेवरील दररोज शेकडो लोकलसह रेल्वेगाड्यांचा खोळंबा होतो. यासाठी अनेक कारणे असली, तरी प्रवासी गाडीतील आपत्कालीन साखळी खेचत असल्याने रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. नोव्हेंबर २०२३ मध्ये आपत्कालीन साखळी खेचल्याने, १९७ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
अत्यावश्यक कारणांसाठी किंवा आपत्कालीन घटनेवेळी उपनगरीय आणि मेल, एक्स्प्रेसमध्ये आपत्कालीन साखळी सुविधा देण्यात आली आहे. मात्र, प्रवासी अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळी ओढतात. यामुळे लोकल, मेल, एक्स्प्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडते.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या वर्षात मध्य रेल्वेने एकूण ७९३ व्यक्तींविरुद्ध विनाकारण संकटकालीन साखळीच्या गैरवापराचे गुन्हे नोंदवले. त्यातून तब्बल २.७२ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर, विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे, १,०७५ रेल्वेगाड्या उशिराने धावल्या. त्यात मुंबई विभागातील ३४४ रेल्वेगाड्या, भुसावळ विभागात ३५५ रेल्वेगाड्या, नागपूर विभागात २४१ रेल्वेगाड्या, पुणे विभागात ९६ रेल्वेगाड्या विभाग आणि सोलापूर विभागात ३९ रेल्वेगाड्या होत्या. त्यात नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेवर साखळी खेचण्याच्या घटनांमुळे १९७ गाड्या उशिराने धावल्या. रेल्वेगाड्यांचा सरासरी वक्तशीरपणा १० मिनिटांनी कमी झाला. त्यातील मुंबई विभागात ७३, भुसावळ विभागात ५३, नागपूर विभागात ३४, पुणे ३० आणि सोलापूर ८ गाड्या होत्या. मुंबई उपनगरीय रेल्वेतील संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे दररोज १२ लोकल उशिरा धावतात, अशी माहिती देण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत