कालचा भारत,आजचा भारत व उद्याचा भारत
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची जगात ओळख निर्माण झाली आहे.जगात यंग इंडिया म्हणून ही भारताची ओळख निर्माण झाली आहे.अनेक जाती धर्मात असलेला व अनेक राजकीय पक्ष असणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.अनेक पुढारी गुडघ्याला बाशिंग बांधून देश स्तरावरील नेता व पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहत आहेत. सत्तेत असणारे बाहाद्दर हवेत स्वप्नांचा गारवा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
कालचा व आजचा भारत पाहिला की भारताची ओळख फक्त लबाडांचा भारत , मोठ्या टग्यांचा व ठगांचा भारत म्हणून झाली आहे.परंतू उद्याचा भारत माझा भारत म्हणून मिरवायचे असेल तर युवकांनी जागतिक ध्येय धोरणांचा अभ्यास करून देशाचा विविध क्षेत्रात झेंडा फडकवत ठेवणे नेत्यांची नव्हे तर स्वतः ची जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे.
फक्त ऑलम्पिक चे उदाहरणे घेतले तर कालचा भारत,आजचा भारत व उद्याचा भारत यात किती बदल झाला हे पहावयास मिळते. आज देशाच्या विविध कोपऱ्यामध्ये नेते मंडळी सत्ता स्थापन करण्यासाठी आपापल्या विचारांना पायदळी तुडवून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतात परंतु ऑलम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये भारत अजूनही पाठीमागे का आहे ? याच्यासाठी हे नेते एकत्र येताना आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही कारण का तर अनेक खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू हे बलाढ्य घरातील, धनदांडग्यांच्या घरातील, वशील्याचे बाबू असल्याचे पाहायला मिळते.
भारताने आतापर्यंत साधारणपणे 36 पदके ऑलम्पिक मध्ये जिंकलेली असतील . त्यामध्ये अंदाजे दहा पदे सुवर्णपदके असतील. परंतु चीन सारखा देश एकाच ऑलम्पिक मध्ये भारतापेक्षा जास्त सुवर्णपदके मिळवून जातो.ही कशाची देणं आहे.या देशांमध्ये खेळांना विशेष असे महत्त्व दिले जाते. खेळावर प्रेम करणारे लोक या देशांमध्ये आढळतात .खेळामध्ये निवड करताना खेळाडूच्या अंगी असलेले गुण पाहिले जातात. त्याची जात - पात
,पैसा व राजकीय वशीला पाहिला जात नाही. जे खेळाडू खेळामध्ये तरबेज आहे अशा खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन असे देश देत असतात.त्यामुळे या देशांमध्ये अनेक महान खेळाडू झालेले पहावयास मिळतात. आपल्या देशामध्ये सुद्धा असे अनेक महान खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व न करताच रिटायरमेंट होतात किंवा खेळाडूंना राजकीय फटका मोठ्या प्रमाणात बसतो.उदाहरणार्थ क्रिकेटचे पाहायचे झाले तर भारतीय टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्य कुमार यादव याला वयाच्या 32 व्या वर्षे आपले कौशल्य दाखवण्यास मिळाले हेच वशीलीबाजीचे द्योतक असावे. असे विविध खेळातील सुर्य कितीतरी असतील.देशाला पदक मिळवून देणारे खेळाडू तयार करायचे असतील तर ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गुणी विद्यार्थी निवडण्यासाठी एक देश पातळीवर विशेष कमिटी नेमणे गरजेचे आहे.त्या कमिटीमध्ये असणारे लोक राजकीय वशिलेबाज किंवा खेळाला काळिमा फासणारे नसावेत. भारतात अनेक खेळाचे अध्यक्ष व सदस्य हे त्या खेळाचा गंधही नसणाऱ्या व्यक्ती असतात ही एक लाजीरवाणी बाब आहे. भारतीय व राज्याचा क्रीडा मंत्री खेळाडूतूनच होणे गरजेचे आहे तरच त्याला खेळाचे महत्व आणि खेळाडूंचे महत्त्व समजेल आणि त्यातूनच भारत जगातील विविध स्पर्धांमध्ये आपला डंका गाजवेल नाही तर कालचा भाग ,आजचा भाग, आणि उद्याचा भाग यामध्ये काहीच फरक पहावयास मिळणार नाही. खेळाडूंचा चमू मोठा परंतु पदकांचा दुष्काळ हा भारताला कायमच पाहायला मिळणार.. या वर्षीच्या पदक तालिकेकडे पाहिले तर छोटे छोटे देश भारताच्या वर आहे. आतापर्यंत भारताला एकच पदक मिळाले आणि त्यामध्ये आपले भारतीय किती छाती फोडून घेत आहेत ही अभिमानाची की लाजीरवाणी बाब आहे.लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये एक नंबर असणाऱ्या देशाने अनेक कुणी खेळाडू तयार करून भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावणे काळाची गरज आहे. हे काम करायचे असेल तर ग्रामीण भागातून शहरी भागातून गोर गरीब तसेच गुणी खेळाडू ओळखणारा वाली या भारतात निर्माण होणे गरजेचे आहे. तरच भारत गुण तालिकेत कधीतरी पहिल्या पाच क्रमांका मध्ये दिसेल नाहीतर भारताची बोटावर मोजण्या पदके विविध स्पर्धेत राहतील.हीच दुर्दैवाचा बाब असेल.
राजकारणामध्ये कालचा भारत, आजचा भारत व उद्याचा भारत याबद्दल टेंबा मिळवणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने खेळा बाबतीत खालचा भारत,कालचा भारत ,आजचा भारत ,उद्याचा भारत व वरचा भारत यामध्ये काय बदल असेल हे सांगण्यासाठी पुढे येणे काळाची गरज आहे.खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मायबाप भारतीय जनतेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.गेंड्याचे कातडीचे राजकीय लोक कालचा भारत, आजचा भारत व उद्याचा भारत जैसे थे…च ठेवणार…..✒️✒️🔬
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत