तथागत बुद्धाने काय स्वीकारले ?
१. माणसाचे मन हे सर्व गोष्टीचा मध्यबिंदू
असून ते प्रचंड शक्तिमान आहे.
२ . मनाची शुध्दता व अशुद्धता हीच सुख
दुःखाचे मुख्य कारण आहे.
३. मनावर जसे संस्कार करावे तसे होऊ
शकतात (चांगले/ वाईट)
४. मनाला चिंतन,मनन द्वारा निर्मळ,
नितळ व शुद्ध बनवले जाऊ शकते.
५. व्यक्तीच्या सुख दुःखाला तोच मुख्यता
जबाबदार असतो. (इतर केवळ
मार्गदर्शक असू शकतात.)
६. व्यक्तीला या जन्मातच दुःख मुक्त
होता येते.
७. जगात कारणाशिवाय काहीच घडत
नाही.
८. जसे कारण तसाच परिणाम होतो.
९. विकारयुक्त मनच शारीरिक मानसिक
दुःख निर्माण करते.
१०. मनाची शुद्धता, निर्मलता हा बुद्ध
धम्माचा मूळ केंद्रबिंदू आहे.(कारण
त्यातच सुख दडले आहे).
११. विश्वात सर्व काही अनित्य आहे,
परिवर्तनशील आहे.
१२. मूर्खापासून संगत करण्यापेक्षा एकटे
राहावे.
१३. क्रोध हा अग्नी आहे, तो
मनुष्यमात्राला जाळतो.
१४. वैराने वैर कधीच मिटत होत नाही ते
अवैरानेच मिटते.
१५. अष्टांगिक मार्गाने जगणे हाच बुद्धाचा
श्रेष्ठ धम्म आहे.
१६. अरहन्त पद, सम्बोधि, बुद्धत्व,
निब्बान मानवी जीवनातील सर्व श्रेष्ठ
अवस्था आहेत.
१७. बुद्ध धम्म हा नैसर्गिक सत्यावर
आधारलेला एकमेव धम्म आहे.
बुद्धांचा धम्म ही त्यांची स्वताची
निर्मिती आहे.
१८. कोणतीही गोष्ट जर विचार,तर्क व
विवेकाच्या कसोटीवर सिद्ध होत
नसेल तर ती स्वीकारू नये.
१९. आळस,अनैतिकता, दूराचार, द्वेष,
अहंकार, घृणा, तिरस्कार, आसक्ती,
लोभ हेच व्यक्तिच्या सर्व नाशाला
कारण ठरतात
२o. मनातील विकार (मी व माझे प्रती
आसक्ती, क्रोध द्वेष, इर्षा, अहंकार)
नष्ट केल्यास आपण सर्व श्रेष्ठ सुख
प्राप्त करु शकतो.
भवतु सब्ब मंगलं!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत