पुतीन आणि किम यांच्या भेटीने जग चिंतेत.

युक्रेनविरोधात युद्ध सुरु असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची भेट होणं शस्त्रकराराकडे इशारा देत आहे. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली असून, त्यांनी जाहीर इशारा दिला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची बुधवारी भेट झाली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एकमेकांना सहाय्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांना या भेटीच्या बहाण्याने रशिया आणि उत्तर कोरियाला शस्त्रांचा मोठा करार करायचा आहे अशी शंका आहे. जेणेकरुन या कराराच्या माध्यमातून युक्रेनविरोधातील युद्धाची स्थिती बदलू शकते.
रशियातील अगदी पूर्वेला असलेल्या व्होस्टोकनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण तळाच्या प्रवेशद्वारावर पुतिन यांनी किम यांचं स्वागत केलं. येथे दोघांमध्ये जवळपास 4 तास बैठक सुरु होती. किम जोंग उन आपल्या ट्रेनने रशियात दाखल झाले होते.
व्लादिमिर पुतीन आणि किम जोंग उन यांनी बुधवारी प्रक्षेपण तळांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये चार ते पाच तास द्विपक्षीय चर्चा झाली. पुतिन यांनी बैठकीनंतर संवाद साधताना, रशिया सॅटेलाइट निर्मितीत उत्तर कोरियाला सहकार्य करेल अशी माहिती दिली. पुतिन यांनी यासाठीच आपण इथे आलो असल्याचं सांगितलं. दरम्यान, पुतिन यांनी यादरम्यान दोन्ही देशात सैन्य सहकार्यावर चर्चा झाल्याचे अनेक संकेत दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत