मराठवाडा प्राध्यापक परिषद
डॉ सुनिलचंद्र सोनकांबळे
सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आपले अस्तित्व काय आणि ते सामाजिक धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या टिकवण्यासाठी आपल्या कोणत्याही राजकीय नेतृत्वाची भुमिका येणाऱ्या काळात काय असावी या संदर्भाने आपली समाजातील उच्च शिक्षित प्राध्यापक बांधवांची भूमिका काय असावी या अनुषंगाने विचार मंथन करण्यासाठी आपण एका दिवशी एकत्र बसावे असे मला वाटते…
नेतृत्व मग ते कोणतही असेल ते नेतृत्व स्वतः ठरवेल तीच अंतीम भूमिका म्हणून वारंवार आंबेडकरी समाजाच्या मतांची दिशाभूल करीत असेल तर त्याचा समाजाने जाब विचारायला हवा
आपल नेतृत्व समाजाला काय अपेक्षित आहे हे विचारत नसेल तर, समाजाने नेतृत्वाला विचारण्याची गरज आहे.
राजकारण हा स्वाभिमान अभिमान नैतिकता दाखविण्याचा आखाडा नव्हे तर प्राप्त परिस्थितीला धरुन वाट्टेल त्या समिकरणांची जुळवा जूळव करुन अख्खा देश खिशात ठेवण्याचा तो सर्वोच्च आखाडा आहे. संसदेत बसूनच संविधान विरोधी लोकशाही प्रवृत्तीला ठेचता येते याच भान ठेवण्याची आता गरज आहे.
हा पक्ष तसा तो पक्ष तसा त्यांने आमचा खीमा केला याने आमच वाटोळ केल म्हणून प्रत्येकाला शत्रू मानल्यास तुमचा राजकारणातील मित्र कोण आहे ?
असा प्रश्न उपस्थित होतो.
आणि आत्ताच्या काळात गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षांपासून हा देश खिशात ठेवणारे पक्ष परस्पर विरोधी असले तरी सत्ता संपादनासाठी एकत्र येतात. युती धर्म पाळून निवडणुकीत विजय संपादन करतात हे त्रिकालाबाधित सत्य असताना आपल्याला ते उमजत नसेल तर इतरांना नावे ठेवत बसण्या खेरीज आपण दुसरे काहीच करु शकत नाही.
ज्या बहुजनांवर स्वार होऊन आपण राजकारणात शिरु पहातो ती सर्व वोट बॅंक प्रस्थापित पक्षांची आहे. हिंदू राष्ट्र समर्थकांची आहे. त्यांना राम मंदिर हवे की दिक्षा भूमी असा प्रश्न केल्यास ते राम मंदिराला प्राधान्य देतील
आपल्या समाजाची महाराष्ट्रातील टक्केवारी पहाता एवढ्या बळावर निवडून येणे शक्य नसताना स्वबळाचा नारा देणे हा ऐनवेळी संविधान द्वेषी प्रवृत्तीला लाभ होईल अशी भूमिका घेणे होय.
आपला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ताधारी समाज बना असे म्हटले आहे तो सुवर्णकाळ एकट्याच्या बळावर कदापी शक्य नाही.
म्हणून स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर कांग्रेसने दिलेले निमंत्रण स्विकारुन एकट्यांनी अख्खा देशातील वंचित उपेक्षित मागासवर्गीय बहुजनांचे मानवी अधिकार शाबूत करुन मगच राजीनामा दिला.त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी टिकाकारांना उत्तर देताना म्हटले होते की, कोणत्याही राजकीय पक्षासोबत दिर्घकाळ शत्रूत्व हे समाजासाठी अहितकारक ठरते म्हणून मी स्वातंत्र्यापूर्वी कांग्रेस सोबत शत्रूत्व बाळगल होत. आता देश स्वतंत्र झाला आहे. माझ्या समाजाचे हित करावे म्हणून मी काॅंग्रैसचे निमंत्रण स्वीकारले ते दगड होऊनच ढेकूळ होऊन नाही.ज्यावेळी मला वाटले मी येथे येऊन चूक केली तेंव्हा मी सरळ बाहेर पडेन
डॉ बाबासाहेब आंबेडकर काॅंग्रेसच्या मंत्रीमंडळात कायदा मंत्री झाले म्हणून का त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला होता का ?
तर आपल्या लोकांना स्वाभिमानी होण्याचे अधिकार देण्याचे एकच ठिकाण ते म्हणजे भारताची संसद आहे तेथे आपण आपल्या समाजाच्या बळावर निवडून जात नाही हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलं होत ना
मग आजच्या आपल्या कोणत्याही नेतृत्वाला अशा प्रकारच्या स्वाभिमान कायम ठेवून सत्तेत जाता येत नाही का ?
मग बाहेर बसून त्यांनी आरक्षण खतम केलं संविधानाची तोडफोड केली म्हणून फक्त मोर्चेच काढायचे का ?
अलिकडच्या काळात तर आपल्या
नेतृत्वाबद्दल काही सूचक अस लिहिल तरी काही भक्तांकडून मोठ्या प्रमाणात धमक्या येण्याची ट्रोल करण्याची भीती निर्माण झाल्याने समाजातील बुद्धीजीवी वर्ग यावर काही बोलायला किंवा लिहायला तयार नाही.
तरीही आज खूप दिवसांनी मी एकदाच आपण यावर बोलू या चर्चा करु या अनुषंगाने अभिव्यक्त झालो आहे. दुसऱ्यांना अंधभक्त म्हणता म्हणता आपण कधी त्याहूनन पुढे गेलो हे आपले आपल्याच कळले नाही अशी आजची परिस्थिती आहे. माझ नेतृत्व कोणतही असेल ते हरल तर मलाच रडू येईल आणि विजयी झाल तर माझीच छाती फुगेल.कारण मी त्या नेतृत्वाला प्रमाण मानल आहे.अशी आपल्या समाजाची भूमिका असायला हवी
येणारा काळ हा पुष्यमित्र
शुंगाचा रहाणार आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना ही केवळ सत्ता संपादनासाठी झालेली असते त्यासाठी ते नैतिक अनैतिक अशा सर्व तडजोडी करुन देश खिशात ठेवतात कारण सत्ता एकदा का हातात आली की स्वाभिमान अभिमान आपोआपच उर्जान्वीत होतो म्हणून ते सत्तेसाठी मित्राची मनधरणी करणार आणि विरोधकांची माती करणार हा त्यांच्या सत्ता प्राप्तीचा राज धर्म असून त्या धर्माला जागत ते कायम सत्ता स्थानी रहातात आणि या धर्माला नावे ठेवत बसणारे सत्तेच्या बाहेर रहातात हे आता आपण सर्वांनी ध्यानी ठेवण्याची नितांत गरज आहे म्हणून आपण सर्वांनी आता आपल्या राजकीय भूमिकेची उजळणी व्हावी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय दृष्टीकोनाचा अभ्यास व्हावा
सत्ता असेल तर स्वाभिमान अभिमान संविधान आहे नसेल तर बाकी सगळा भाषणाचा विषय आहे ज्यांने सत्ता प्राप्ती होणारच नाही कारण भाषण आणि व्यवहार या राजकारणातील दोन परस्परविरोधी भूमिका आहेत.
त्या एकत्र आल्या तर सत्ता मिळणारच नाही हे समाजाने आता ध्यानी घ्यावे एवढेच…
डॉ सुनिलचंद्र सोनकांबळे धर्माबाद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत