जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ ह्यांचे कुटुंबाला एक कोटी रुपये आणि कुटुंबातील सदस्यास नौकरी देणे बाबत वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे वतीने निवेदन.
प्रति,
मा. राज्यपाल
राज्यपाल भवन,
महाराष्ट्र राज्य.
मा मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,
मुंबई, महाराष्ट्र.
विषय:- जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ ह्यांचे कुटुंबाला एक कोटी रुपये आणि कुटुंबातील सदस्यास नौकरी देणे बाबत वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे वतीने निवेदन.
महोदय,
वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश कडून सदर निवेदन सादर करण्यात येते की, जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाले.शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जिल्यातील एका सैनिकाने देशासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.मात्र त्याचे पार्थिव जिल्ह्यात दाखल झाले असता कुठलाही अधिकारी विर सैनिकाचे पार्थिव घ्यायला हजर नव्हता.सोबतच त्यांचे मूळ गावी अंत्यसंस्कार ठिकाणी प्रचंड चिखलात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आला. त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन ह्यांनी केली नाही.केवळ उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही.
केवळ जिल्हयात ह्या शहीद सैनिक आणि त्यांचे कुटुंब ह्यांची अवहेलना झाली असे नाही तर राज्य सरकारने देखील त्यांची दखल घेतली नाही.
कुलगाम मध्ये त्याच दिवशी प्रविण जंजाळ ह्यांचे सोबत हरियाणा येथील जिंद जिल्ह्यातील जाजनवाला ह्या गावातील सैनिक पॅरा कमांडर प्रदीप नैन ह्यांना सुद्धा वीरगती प्राप्त झाली आहे.शहीद सैनिक पॅरा कमांडर प्रदीप नैन ह्यांचे बलिदानाची दखल घेऊन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक कोटी रुपये राशी आणि शहीद सैनिक प्रदीप नैन ह्यांचे कुटुंबातील एका सदस्याला नौकरी देण्याची घोषणा केली आहे.आपले राज्य पुरोगामी म्हणून ओळखले जात असताना आणि पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात वीरगती प्राप्त झालेले जवान प्रवीण जंजाळ ह्यांचा बाबत उदासीनता बाळगण्यात आली आहे.हे अत्यंत क्लेशकारक आहे.मी युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव असून माझे वडील निरंजन आबुजी पातोडे ह्यांनी भारतीय सैन्यात सेवा केली असून १९६५ आणि १९७१ चे लढाईत त्यांनी देशांसाठी कर्तव्य बजावले आहे. त्या मुळे सैनिक आणि त्यांचे कुटुंब ह्यांचे व्यथा आणि भावना ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.
सबब आपणास मागणी करण्यात येत आहे की, जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ ह्यांचे कुटुंबाला हरियाणा राज्याचे सरकारने घेतलेल्या निर्णया प्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारने एक कोटी रुपये आणि कुटुंबातील सदस्यास नौकरी देण्याची घोषणा तातडीने सभागृहात करावी. आणि युद्ध पातळीवर त्याची अंमलबजाणी करून वीर सैनिकाचे आणि त्याचे कुटुंबियांचे प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय जाहीर करावा.करीता वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे वतीने सदर निवेदन देण्यात येत आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101.
प्रतिलीपी:-
१. मा. जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
जिल्हा अकोला.
२. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, भूविकास बँक जुनी इमारत, अकोला-444001
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत