स्पर्धा परीक्षा कथा आणि व्यथा

अंजली भालशंकर
म्याडम तुम्ही काय करता हो? नाही, म्हणजे नेहमीच पहातो तुम्हाला काही ना काही लिहीत कींवा वाचत असता ,मी रोज इकडे एक्सरसाईज करतो सकाळी पहातो ना म्हणून सहज विचारतोय.अनपेक्षित आवाजाने मी पुस्तकातुन वर पाहीले पंचवीशीच्या आसपासचा, हडकुळया अंगकाठीचा तरुण माझ्या खुर्चीपासुन जरा दूर ऊभा राहून मला प्रश्न करीत होता थोडक्यात जुजबी,माझ्या विषयी सांगीतल्यावर,असे होय,मी जरा बसू का ईथे परवानगी घेत तो, खुर्चीच्या दुसर्या टोकावर बसता बसता अगदी सहज म्हणाला ताई तुम्ही आमच्या वर पण लिहा बरं!! अगदीच हककाने परंतू नम्रपणे त्याने सरळ मुद्द्याचे बोलण्यास सुरवात केली. ताई तुम्ही खरच आमच्या विषयी लीहा आम्ही सगळी मुलं तुमच्या बाजुने उभे राहु. कोणीतरी आवाज ऊठवायला हवा. बाप रे!हा काय मला नेता ,कींवा फार मोठी लेखिका वगैरै समजलाय की काय??
बरेचदा माझ्या कामानिमित्त, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या शेकडो मुलांशी माझा परीचय येतो सहाजिकच बोलण्यातून थोडाफार या लोकांच्या समस्या व अनुभव कळतात अगदी दर वेळेस नाही जमले तरी बरेचदा मी मुलांविषयी लिहीत असते माझ्या मध्यान्ह मध्ये व सोशल मिडीयातील सर्व प्लॅटफॉर्म वर मी वेळोवेळी माझे अनुभव लेखन मांडते .परंतु आज या मुलाने अनेक तपशीलवार गोष्टी माझ्याशी शेअर केल्या त्या पैकी खर्या खोट्याचे पडताळणी व निकश लावायची मला गरज भासली नाही कारण तो पुढचे एक तास माझ्यासमोर ज्या पोटतिडकीने व्यक्त झाला,ते ऐकून मला आवश्यकताच नाही भासली. ताई मी *आय बी* ची तयारी करतो मागच्या ऐकझामला आठ मार्कांनी गेलो पार्ट टाईम जाॅब करतो *मुलींसारखी हाप मेस आहे माझी असे केवीलवाणे कसनुसे हसून म्हणाला तेव्हा पोटात कालवले माझ्या कितीक आणि मुली हाप पोटी रहात असतील याची आकडेवारीचा अंदाज बांधू लागले मी मनातच* ताई खूप सारी मुल एम पी एस सी, यू पी एस सी करतात एका रूम मध्ये आम्ही पाच जण रहातो म्हणून रेंट परवडत. बर्याच मुलांना घरून पैसै येत नाहीत *मग सरकारी अनुदानाच काय* ,ताई तसे तर अनुदान मिळते *बाआरटी, महाज्योती ,सारथी,अमृत, आय टी आर एफ की अशीच काही योजना आहे ज्यात एस सी ओबीसी, ब्राम्हण व ट्रायबल कम्युनिटी साठी आहेत पैकी अमृत ही ब्राम्हणांसाठी आहे* ((ही एक नवीच माहीती माझ्यासमोर))पंरतु तरतुदीनुसार रककम जास्त,पंरतु प्रत्यक्षात रककम कमी मिळाली , म्हणजे पहा तीन महीण्यांचे दहा हजार प्रमाणे मला व माझ्या तीन मित्रांना तीस हजार यायला हवे होते ते प्रत्येकाच्या हाती *सत्तावीस हजारच पडले, मग आम्ही काही विद्यार्थी संबंधित अमुक साहेबांना भेटलो तर मी "काहीही करू शकत नाही" ही वरपासूनची लाॅबी आहे म्हणून त्यांनी विषय संपवीला.अनुदान तसे तर काहींना तीनचार महींण्यासाठी,तर काहींना सात आठ महीण्यासांठी मिळते फक्त म्हणजे राज्यसेवेच्या तयारी करणार्यांना चारपाच महीने व यु पी ऐस सी वाल्यांना आठ दहा महीने* असेल.त्यांचा अभ्यास फार टफ असतो.पंरतु एक सांगू का ताई यू पी ऐस सी वाल्यांकडून तलाठी एक्झाम पास होण्याची गॅरंटी नाही कींवा पोलीसची एक्झाम पण नीघणार नाही. त्यांचा अभ्यास, प्रश्न असतात खुप अवघड म्हणून असेल,आपल्याकडे महाराष्ट्रात अगदी चार पाच टक्के प्रमाण त्यामानाने बिहार यूपी एम पी चे लोक यूपीएस सी जास्त सक्सेस आहेत त्यांना तसे ट्रेनिंग दीले जाते तसे आपल्या कडे सुविधा कमी आहेत. सरकारांकडून अपेक्षा आहेत.हे पार करणे आवघड आहे म्हणूनच आम्हाला *राज्यसेवा इंटर ब्यू पॅनलचे लोक सांगतात तुमचा प्लॅन बी पण तयार ठेवा* आमचे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेणारे सर आहेत जे कमीशनर साहेबांचे रूममेट होते ते ही खुप छान समजावून सांगतात नेहमीच चांगले मार्गदर्शन करतात " *मग घरच्यांचे काय मत असते ?म्हणजे काही लोक एका ॲटेमट मध्ये पोस्ट लागते तर काहींना अनेकदा प्रयत्न करूनही यश येत नाही असं एकलेय मी* *म्हणजे साथ कीतपत मीळते* घरून पैसे येतात की फक्त *अनुदान* ते तर पहील्या प्रयत्नावेळेसच मिळते, म्हणजे निरनिराळ्या एक्झाम तयारी साठी वेगळे पैसे मिळायचे पंरतु आता *गव्हरमेंटने ते पण कबांईन करायचा निर्णय घेतलाय म्हणजे सर्व प्रकार च्या परीक्षांसाठी एकच ऐकझाम ठेवलीय, म्हणजे पहा मी आय बी साठी अनुदान घेतलेय व आता प्लॅन बी समोर ठेऊन दूसरी एक्झाम दीली व त्यासाठी अनुदानाचा फार्म भरला तर यू आर नाॅट इलीजीबल म्हणतात* मी घरून पैसे घेत नाही. या वर्षीच्या *अर्थसंकल्पात तर आमच्यासाठी तर फक्त चारच टक्के तरतूद ठेवलीय पैसे पुरत नाहीत म्हनुन पार्ट टाईम जाॅब करतो जाॅब केला तर जाणे येणे व कामाची वेळ यामध्ये आठ दहा तास निघून जातात मग आठ दहा तास झोप व इतर दैनंदिन कामात जातात उरलेल्या चार पाच तासात काय अभ्यास होणार आहे* *काँपीटेटीव एक्झाम कीती टफ असतात आता अभ्यासक्रम पण सोपा नाही राज्यसेवेचा अभ्यासक्रम सुद्धा जवळपास सेंट्रल लेवलचा आहे काँमपीटिशन टफ आहे म्याडम मध्यंतरी कारागृह नीरीक्षकाच्या एका जागेसाठी 420 इंटर ब्यू झाले आणि अर्ज दोन लाख पहा कशी मिळणार संधी कोणाकोणाला? **पर्याय काय??* आहेत ना, अनेक ,स्टाफ सिलेक्शन कमिशन, यू पी ऐस सी ,एम पी एस सी, फर्स्ट, सेकंड, बँकीग,ऐस जे आय, आर बी आय पंरतु विद्यार्थी संख्या पण भरपूर आहे .घरचे लोक अपेक्षा ठेवून आहेत तसे काही लोकांचे घरात स्पर्धा परीक्षेतून सर्विस लागलेले असतात त्यांना या क्षेत्राची कल्पना असते.माझेच पहा,माझा भाऊ व मी दोघेही इथे आहोत मी आय बी सेक्युरीटी ऑफिसर ची तयारी करतोय भाऊ यू पी एस सी ची तयारी माझी आठ मार्कांनी पोस्ट हुकली. प्रि एक्झाम निघाली मिन्स मध्ये गेलो.घरचे लोक सपोर्ट करतात मला पंरतु सगळ्यांचे असे नाही *मुलींचे तर फार प्रोब्लेम आहेत वय वाढतं जात आईवडीलांना व त्यांच्या पेक्षा नातेवाईक व #गावातील लोकांना फार चिंता वाटते इतके वय झाले लग्नाचे काय?ते आईवडीलांना ढोसतात मग ते मुलींवर प्रेशर आणतात पण त्या मुलापेक्षा स्ट्रोंग असतात मुलांची ही गोष्टी वेगळ्या नाहीत बरीच मुलं व्यसनाधीन होतात फस्ट्रेशन मध्ये जातात काही जण तर आत्महत्याच करतात* होय! त्या विषयावर लिहीलेय मी. काही मुलांचे आरोग्य बिघडत,वयोमानानुसार पोट सुटत टक्कल पडत मग मुली नकार द्यायला लागतात बर्याच मुलींच्या अपेक्षा आपल्यापेक्षा नवरयाची पोस्ट वरची असावी, दिसायला बराच असावा वगैरै... हे असे आहे ताई,एकुनच पुण्यातील,ऐकुणा पैकी तीन चार लाख विद्यार्थी या भागातच आहेत. मी तीकडे राजेंद्र नगर मध्ये रहातो.तिथे इथल्या पेक्षा रेंट कमी आहे जेवणाची आबाळ होते बरेचदा. रविवारी तर मेसच बंद असते.वडापाव किंवा रोडवर जे मिळेल ते खायचे लायब्ररी परवडत नाही इथे येऊन अभ्यास करतात काही मुल. आता ही समोरची बिल्डींग पहा पार्क च्या बाजुला म्हाडा ची रीनीवेशन होणार्या इमारतीकडे पाहुन बोलला, आता ही अकरा मजली ईमारत होणार या समोरच्या पण तशाच होणार मग या पार्कात हवा ऊन येईल का ?एकदमच विषयांतर करून जरासा तणाव कमी करण्याचा त्यानेच प्रयत्न केला खरा पंरतु त्याच्या
डोळयात लख्ख चकाकणारे दोन मोती माझ्या डोळ्यातली झापड ऊतरवून गेले या समाजाचा एक भाग म्हणून गालावर सनसनीत थप्पड सुद्धा! आणि मन! मनात खोलवर घाव. मी स्तब्ध झाले होते.बीलकुल निशब्द!
C लेखिका अंजली भालशंकर पुणे 30
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत