खासदार हेमंत पाटील यांना अटक करावी यासाठी संविधान चौकात आक्रोश.

आदिवासी उच्च पदी असणाऱ्या मागासवर्गीय अधिकारी डाँ वाकोडे यांचा जातीयतेतून अपमान करणाऱ्या जातीयवादी *खासदार हेमंत पाटील यांना अटक करावी व त्यांची खासदारकी रद्द करावी या मागणी साठी संविधान चौकात आक्रोश
आंदोलन करण्यात आले.
खासदार हेमंत पाटील, ब्राम्हणी व्यवस्थेच्या गुलाम आहे तो वर्ण व्यवस्थेचा समर्थक आहे, म्हणून तो ब्राम्हनाना श्रेष्ठ मानून आदिवासी -दलितांना तूच्छा समजतो पण तो ब्राम्हणी व्यवस्थेत शूद्र आहे हे विसरून एका मागासवर्गीय उच्च पदी असणाऱ्या डाँ वाकोडे यांचा अपमान करू शकला नसता.. या जातीयवादी खासदाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी ….. आज संविधान चौकमध्ये विविध संघटनाचे वतीने अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती द्वारा धरणे निदर्शने करून खासदार हेमंत पाटील व सरकारचा निषेध करण्यात आला ..
धरणे व निदर्शने आंदोलनअरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ, यांचे नेतृत्वात ,डाँ अशोक उरकुडे यांचे संयोजन, सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डाँ बी एस गेडाम यांचे अध्यक्षते खाली तसेच डाँ सूचित बागडे, अशोकभाऊ सरस्वती,प्रा मधुकर उईके,प्रा. राहुल मुन, प्रा रमेश पिसे,काम्रेड राजेंद्र साठे,ऑफिसर फोरमचे सच्चीदानंद दारुण्डे,आर डी आत्राम,प्रा जयंत जांभुळकर, डाँ आर कोसे,रिपब्लिकन नेते दिनेश गोडघाटे, काष्ट्राईबचे. ,श्यामराव हाडके,सुरेश तामगाडगे, जयंत साठे सिताराम राठोड,बाणाई चे राहुल परूळकर यांचे उपस्तितीत तीव्र निदर्शने करण्यात आली…
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डाँ वाकोडे याच्या कक्षात जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांना दमदाटी करून संडास साफ करायला लावणारा जातीयवादी खासदार हेमंत पाटील याने केलेले कृत्य अमानवीय आहे. महाराष्ट्रात आदिवासी – अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांना अपमानस्पद वागणूक दिली जाते.सातत्याने त्यांचा आरक्षणवरून अपमान केला जातो,औकात काढली जाते,हेमंत पाटील याने डाँ वाकोडेचा केलेला अपमान हा त्यांचा नसून संपूर्ण अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा आहे.तसेच पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान केला आहे
एखाद्या ब्राम्हण अधीकाऱ्याला संडास साफ करायला लावण्याची हिम्मत या खासदाराने केली असती का?निश्चितच नाही, पैसा व पदाचा अहंकार असलेल्या हेमंत पाटील यास तात्काळ अटक करावी त्याची खासदारकी रद्द करावी या मागणी साठी तसेच डाँ वाकोडे अधिष्ठाता यांना न्याय मिळावा त्यांची खासदारकी तात्काळ रद्द करावी आणि अधिष्ठाता डाँ वाकोडे यांचेवर सुद्बुद्धीने दाखल केलेले गुंन्हे रद्द करावे, ऍट्रॉसिटी ऍक्ट ची प्रभावी अंमलबजावणी करावी. सरकारी रिक्त पदे भरावी व सर्व शासकीय रुग्णालय यास औषध पुरवठा, साधन सामुग्री व डाँक्टरांची, नर्सेस ची पदे भरावी यासाठी अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती द्वारा तीव्र धरणे व निदर्शने करण्यात आली याप्रसंगी मुख्यमंत्री, व उपमुख्यमंत्री यांचाही निषेध करण्यात आला
-सीताराम राठोड, काष्ट्राईब महासंघ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत