योगाचे निर्माते तथागत बुद्ध आहेत…
पतंजलीने 2500 वर्षांनंतर योगाचे ब्राम्हणीकरण केले…
संदर्भ ग्रंथ – योगाचे ब्राम्हणीकरण
लेखक- डाॕ.प्रताप चाटसे.
संकलन – संतोष बेळवी..
(पुरावे ढिगाने आहेत पण येथे जागेअभावी आणि वेळेअभावी थोडच लिहले आहे.)
योग आणि मार्शल आर्टचा बुद्धाने शोध लावला योगाची निर्मिती पतंजली या ब्राम्हणाने केली नसून त्याच्या आधिपासूनच योगा आहे, बौद्ध विद्यापीठातून काढुन टाकलेला विद्यार्थी म्हणजे ‘पतंजली’… याने योगाच्या उत्पतीनंतर जवळपास 2500 वर्षानंतर पतंजलीने ब्राम्हणीकरण केले.
सिंधुकालीन इतिहासाचे दोन पुरावे सध्या उपलब्ध आहेत ते म्हणजे सिंधुकालीन पुरातत्वीय उत्खनन व वेदामधील लिखाण..
1) सिंधू कालीन पुरातत्वीय उत्खननामध्ये ध्यानस्त योगीच्या मुद्रा संशोधकांना सापडलेल्या आहेत.
2) ऋग्वेदातील ऋचा म्हणते कि, यज्ञाचे पालन करत नाहित, वैदिक देवतांना मानत नाहित, त्यांच्या पैकि काहि लोक हे संन्यासी बनून वनामध्ये भटकत राहतात व जंगलामध्ये शांत बसून ध्यान, चिंतन करीत असतात. योग हा मूळ भारतील लोकांची परंपरा आहे तर मग ब्राम्हणांची परंपरा कोणती होती? तर त्यांची परंपरा म्हणजे यज्ञ परंपरा होय. ब्राम्हण हे योग परंपरेचे नव्हे तर भोग परंपरेचे अर्थात, यज्ञ परंपरेचे निर्माते व पालनकर्ते होते. हे ऋग्वेदातील पुराव्यावरून सिद्ध होते.
सिंदूकालीन उत्खननात योगमूर्त्या दिसून आले. जगभरात उत्खननात अशा योग मूर्त्या कुठेच आढळून येत नाहित, ब्राम्हणांचे वैदिक देव इंद्र, ब्रम्हा वगैरे देवता योग मुद्रेमध्ये अजूनही कूठे मिळालेले नाहित.
तसेच ग्रिकांचे अपोलो, झियस या देवता सुद्धा योगमुद्रेमध्ये आढळून येत नाहित. केवळ सिंधूकालीन लोकांच्या व बौद्ध कालीन बुद्धाच्या व वर्धमान महावीर यांच्याच मुर्त्या योगमुद्रेमध्ये सर्व जगभर सापडतात.
तथागत बुद्धाने सर्वात पुढचा टप्पा गाठला! त्यांनी सिंधूकालीन साध्या मांडीला पदमासनाच्या मांडीमध्ये बदलवले!! पदमासनाची मांडी साध्या मांडीपेक्षा कठीण असते..
मनाच्या तीव्र एकाग्रतेसाठी बोधीसत्व हा ‘श्वास व उच्छवास’ यावर मन केंद्रित करतो, याला पालीमध्ये “अनापानसती” असे म्हटले आहे, त्याच्या धम्मामध्ये एकूण 32 पायऱ्या आहेत.
जोडणे या शब्दाला पाली भाषेमध्ये ‘युगा’ म्हणतात. तर संस्कृत मध्ये ‘युज’ म्हणतात. “युगा” या पाली शब्दापासून पुढे युज हा संस्कृत शब्द बनला अर्थात पाली युगा या शब्दापासूनच योगा किंवा योग हा शब्द निर्माण झाला.
इ.स.पूर्व 185 च्या प्रतिक्रांती नंतर ब्राम्हणीकरण सुरु झाले.
पुष्यमित्र शुंगाने भिक्षुंचा कत्लेआम केला, तसेच बौद्ध विद्यापीठांना व बौद्ध ग्रंथाना जाळून टाकणे, बौद्ध तत्वज्ञानाला विकृत करुन त्याला ब्राम्हणीवादी बनविणे अशा विध्वसंक कारवाया त्याने चालू केल्या.
पुष्यमित्र शुंगाचा गुरु पतंजली होता
बुद्धाच्या तत्वज्ञानाचा व योगाचा मुख्य उद्देश हा ब्राम्हणवादि अज्ञानाचा नाश करुन ‘बुद्धत्व म्हणजेच बौद्धीकता’ निर्माण करणे. परंतु पतंजली ने बुद्धाच्या “अष्टांगमार्गालाच” “अष्टांगसुत्र” हे नाव दिले आणि “बौद्धतत्वज्ञान” असलेल्या “योगालाच” पुढे “योगसुत्रे” हे नाव दिले. तसेच बुद्धाच्या “अनापानसती” या तत्वज्ञानाला “प्राणायाम” हे नाव दिले.
अर्थात, पतंजली ने नविन तत्वज्ञान मुळाच विकसित केले नाही तर त्याने जून्याच बौद्ध तत्वज्ञानामध्ये फक्त “शब्द बदल” केला,
बौद्ध योगाचा मुख्य उद्देश “बुद्धत्व प्राप्ती” हा होता, परंतु पतंजलीने त्याच्या योगाचा मुख्य उद्देश “ईश्वरप्राप्ति” हा ठेवलि,
पुढे गुप्त काळामध्ये ब्राम्हणांनी “भगवदगीता” लिहून बुद्धाच्या अष्टांग मार्गातील “सम्यक कर्म” या तत्वाला ब्राम्हणांनी भगवदगीतेमध्ये “कर्मयोग” हे नाव दिले, तर बुद्धाच्या “योगद्वारे बुद्धत्व प्राप्तीला “ज्ञानयोग” हे नाव दिले..
बाहेरच्या देशात, इतकच काय बुद्धाचे धम्मचक्र, ज्याला आपण ‘अशोकचक्र’ म्हणतो ते देखिल कृष्णाच्या करगळीत दाखवून त्याला “सुदर्शनचक्र” असे नाव दिले.
Yoga body Buddha Mind,
Yoga mother Budhha song,
अशा प्रकारचे स्लोगन वापरुन योग हि बुद्धाची निर्मिति आहे हे दर्शवतात…????️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत