महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

……………. बुध्द ……………..

बुध्द त्यानेही वाचला
बुध्द मी सुद्धा वाचला
फरक मात्र एवढा….
तो बुध्दाला फक्त
शांतीचं प्रतीक समजतो
आणि मी क्रांतीच….

बुध्द त्याच्याही घरात आहे
बुध्द माझ्याही घरात आहे
फरक मात्र एवढा ….
तो बुध्दाला फक्त
वंदनीय समजतो
आणि मी प्रेरणादायी….

बुध्द त्याच्याही डोक्यात आहे
बुध्द माझ्याही डोक्यात आहे
फरक मात्र एवढा
तो बुध्दाला फक्त
ध्यानस्थ बसलेला समजतो
आणि मी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जनक

बुध्द त्याच्याही मनात आहे
बुध्द माझ्याही मनात आहे
फरक मात्र एवढा….
तो बुध्दाला फक्त
हिंसेच्या विरुद्ध समजतो
आणि मी न्यायाच्या बाजूचा…

बुध्द त्याच्याही दृष्टीत आहे
बुध्द माझ्याही दृष्टीत आहे
फरक मात्र एवढा ….
तो बुध्दाला फक्त
धर्म संस्थापक समजतो
आणि मी मानवतेचा संदेश…

बुध्दाला भगवान तोही म्हणतो
बुध्दाला भगवान मीही म्हणतो
फरक मात्र एवढा …….
तो भगवान शब्दाचा अर्थ ईश्वर समजतो
आणि मी भगवा रूप असलेला त्यागी..

शेवटी खंत मात्र एवढीच
तो बुद्धाला विष्णूचा
नववा अवतार मानून
मोक्षदाता समजतो
आणि मी मानवाच्या पोटी पुत्र मानून
अत्त दीप भव सांगणारा
मार्गदाता समजतो
मार्गदाता समजतो
मार्ग दाता समजतो…..

……..✍️ कवी दुर्बिण………..
Mo no 7744992566

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!