भारतीय जनतेचे दोन महान शत्रू 1.भांडवल वाद 2. मनुवाद
दत्ता तुम वाड
भारतीय जनतेचे दोन महान शत्रू 1.भांडवल वाद 2. मनुवाद. _ भारतिय जनता वर्ग जाती धर्म या तीन विभागात विभागलेली आहे.याचा अर्थ ती भारतीय असली तरी एकसंघ नाही.तिचे मुख्य तीन तुकडे आहेत.उपतुकडे तर शेकडो हजारो आहेत.हे खरे तर प्राणिजात मधे मानवजात एकच असायला पाहिजे.एकसंघ असायला पाहिजे.तर मग दीलके हजार तूकडे कींव बन गये ? मानवतेला तडे का गेले ? याचे कारण भांडवलवादी आणि मनुवादी विचार.माणसाला माणसा पासून दूर करण्यात ,त्यांच्यात द्वेष मत्सर वैर निर्माण करून भांडण लावण्यात ,हिंसा घडविण्यात या भांडवली विचार आणि मनुवादी विचार यांची अहम भूमिका आहे,ती कशी ? आणि या विषमता निर्मितीचे निर्माते कोण ? त्या विचारातून काय निर्माण झाले ? त्याचे दुष्परिणाम काय ? याचा विचार म्हणजेच अखिल भारतीय जनतेसाठी कल्याणकारी विचार होय. भारतातील काही स्वार्थी आपल्पोट्या लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आम् जनतेचे शोषण सुरू केले,जुलूम जबरदस्ती ,अन्याय अत्याचार करू लागले त्यातून पैसा संपती जम ऊ लागले.त्या पैशाचे संपत्तीचे संरक्षण करणे साठी या स्वार्थी लोकांनी धर्म आणि सत्ता या दोन गोष्टींची निर्मिती केली. शोषण पिळवणूक ,काळाबाजार,महागाई,साठेबाजी, व्याज यातून संपती पैसा आणि धन एकवटले गेले,यातून शोषक आणि शोषित असे मुख्य दोन वर्ग आणि त्याचे गरीब मध्यम श्रीमंत असे तीन उपवर्ग निर्माण झाले.अशा प्रकारे आर्थिक शोषण यातून आर्थिक वर्ग या एकसंघ भारतीय जा जा जनतेत निर्माण झाले.खाते तर आधी हे वर्ग नव्हते.ते नंतर निर्माण झाले.ते ऐतखाऊ ऐश आरामीचे सुखलोलुप जीवन जगू पाहणाऱ्या स्वार्थी लोकांनीच निर्माण केले.हे आधी समजून घेण्याची गरज आहे.गरीब मध्यम श्रीमंत भांडवलदार या चार वर्गात स्पर्धा असते.ते एकमेकाची पिळवणूक करतात,पाय ओढतात,हिंसा करण्यापर्यंत यांची मजल जाते.कारण या वर्गात स्पर्धा असते.पुढे पुढे जाण्याची.पुढच्याला मागे खेचण्याची.वर्गीय आर्थिक समाजामध्ये स्पर्धा जरी असली ,आणि एकमेकाचे शत्रू जरी असले तरी ते त्यांच्या स्वार्थापायी म्हणजे.शोषण अन्याय अत्याचार या साठी ते एकत्र येतात.संघटित होऊन सत्ता आणि धर्माचे संरक्षण करतात.कारण धर्म हा देवाच्या नावाने शोषण पिळवणूक अन्याय अत्याचार भ्रष्टाचार लपविता येतो.या अवैध अनैतिक गोष्टीला मान्यता देतो,म्हणूनच हे भांडवलवादी स्वार्थी लोक देव धर्म याचा गाजावाजा करतात.आणि सत्ता आपले पाप लपविते म्हणून सत्ता आपल्या हाती ठेवतात.मग पक्ष कोणताही यांना चालतो.पण तो असा पक्ष हवा की जो देव धर्म वर्ग यास मान्यता देणारा असला पाहिजे.कारण देव धर्म वर्ग असलेला समाज आणि व्यवस्था यांच्या स्वार्थाला पूरक असते.पाठराखण करीत असते.खरे तर देव आणि धर्म ह्या केवळ संकल्पना असून त्या मानवनिर्मित आहेत.निसर्गनिर्मित नाहीत.हे डोक्यात घेण्याची गोष्ट आहे. मनुवाद म्हणजे मनु या विकृत बुध्दीच्या विषमतावादी डोक्याच्या माणसांनी निर्माण केलेला विचार आणि व्यवस्था आहे. ज्यात धर्मांधता जातीभेद वर्णभेद चे विचार आहेत.मानवनिर्मित वेदात वर्णव्यवस्था चे विचार मांडले आहेत.आणि त्याचे महत्त्व विषद.केले.आहे.त्याचा दुष्परिणाम असा झाला की ,एकसंघ भारतीय समाज दुभांगल्या गेला.ब्राम्हण क्षत्रिय वैशा शूद्र अतिशूद्र असे त्याचे तुकडे पाडले.त्यांच्यात उच्चनीच श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव निर्माण केल्यागेला.हे महापाप वेद निर्मात्या स्वार्थी माणसाने केले.त्यात अजून शेकडो हजारो तुकडे जातीच्या नावाने मनु या माणसाने करून अस्पृश्यतेचे महापाप केले.नैतिकता सोडली.एक जात दुसऱ्या जातीची गुलाम झाली.गुलामाची दस्यत्वाची व्यवस्था राजेरजवाडे आणि मनु महाराजांनी केली. . . लेखाच्या शेवटच्या टप्प्यात भांडवलवाद आणि मनुवाद ची व्याख्या वरील विश्लेषण द्वारे थोडक्यात अशी करता येईल की,स्वतःच्या सुखासाठी इतरांचे शोषण करून समतेऐवजी विषमतेचे.विचार सिद्धांत मांडून विषमतेवर आधारित समाजरचना निर्माण कारणे ,त्यासाठी देव धर्म सत्ता यांचा आधार घेणे म्हणजे भांडवल वाद आणि मनुवाद होय.भांडवल याचा अर्थ पैसा संपती ,संपती म्हणजे जमीन जंगल,पाणी,बंगले इत्यादी मटेरियल वस्तू निर्मिती व त्यावर हक्क सांगणे,त्यासाठी वाद घाल ने.धर्मासाठी जातीसाठी वाद घळने,म्हणजे आमचेच.कसे योग्य आहे हे पटविण्याचा प्रयत्न करणे
म्हणजे वाद.d
थोडक्यात स्वार्थासाठी मांडलेले विचार आणि सिद्धांत आणि त्या विचाराची व्यवस्था आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केलेला सारा खटाटोप म्हणजेच भांडवल वाद आणि मनुवाद होय. _.
लेखक : दत्ता तुम वाड.सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक: 12 जून 2024.फोन: 9420912209.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत