
भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या योगदानाचा सन्मान करणे, तसेच माजी सैनिकांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या संचलनाचा उद्देश होता. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचा माजी सैनिक दिन दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. त्यानिमीत्ताने आज मुंबईत विशेष संचलनाचं आयोजन करण्यात आलं होते. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात एनसीपीए इथे झालेल्या संचलनात तिन्ही दलांच्या शौर्य पुरस्कार विजेत्यांसह ५०० पेक्षा जास्त माजी सैनिक, एनसीसी आणि एससीसीचे कॅडेट्स सहभागी झाले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत