महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

शिवरायांची_आरती -बामणीकावा

शिवमावळा शिवराज प्रदिपराव_जाचक,

19 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेरील सर्व मराठा – बहूजनांनी शिवछत्रपतींची जयंती एकाच दिवशी साजरी केल्याची ऐतिहासिक घटना घडण्यामागे अनेक सामाजिक संघटनांचा काही दशकांचा वैचारिक लढा यशस्वी झाल्याचा परिपाक होय आणि पुरंदरे – बेडेकर – साळगावकर सारख्या दिड – दमडीच्या भटांचा डाव उलटवल्याची नांदी होय पण हार मानेल तो भट कसला?? मग यांनी नवीन षडयंत्र रचले ज्या माध्यमातून शिवरायांच्या आरती चा नवा प्रकार राज्यात चालू झाला आहे. महाराजांची आरती करण्याने भविष्यात बहूजन समाजाचा किती भयंकर तोटा होणार आहे त्याची मिमांसा पुढीलप्रमाणे ज्यामध्ये महाराजांना महापुरुष न मानता देवत्व बहाल करणे देवत्व बहाल केल्याने तोटा ब्राम्हणेतरांचा होणार तर फायदा भटांचा होणार…
१) महापुरुषांकडून प्रेरणा मिळते ती प्रेरणा देवत्व बहाल केल्यावर संपून जाते.
२) एकदा देवत्व दिले की चमत्काराची जोड देऊन महाराजांचे अवमूल्यन होणार.
३) त्यानंतर महाराजांच्या नावाने जत्रा / यात्रा भरणार.
४) काही दिवसानंतर शिवछत्रपती खेड्यातील बाया – बापड्यांच्या अंगात येणार.
५) हळूहळू त्यांच्या नावाने उपासतापास सुरु होतील.
६) मग कोंबडे / बकरे कापले जाणार.
७) अंगारे – धुपारे चालू होतील.
८) महाराजांचे मंत्र येतील, चमत्काराने भरलेल्या पोथ्या येतील.
९) महाराजांना लोक नवस बोलतील आणि मग नवसाला पावणारा बाबा म्हणून आपली प्रेरणा संपवली जाईल.
या सर्व गोष्टींची सुरुवात म्हणजे महाराजांची आरती होणे हे आहे.
आरती ची सुरुवात RSS च्या बगलबच्च्यांनी केव्हा सुरु केली याचा शोध घेतला तर 19 फेब्रुवारी ही महाराजांची जयंती ची तारीख सर्व सामाजिक संघटनांकडून निश्चित झाल्यावर संघाच्या हातून हा मुद्दा सटकताच महाराजांच्या देवत्वाचा (आरतीचा) इश्यू चालू झाला म्हणून महाराजांच्या सर्व मावळ्यांनी (अनुयायांनी) या गोष्टीला कडाडून विरोध करावा.

???? #जयशहाजीराजे ???? ???? #जयजिजाऊ ????
???? #जयशिवराय ???? ???? #जयसंभाजीराजे ????
???? #जयशाहूछत्रपती ????

शिवमावळा शिवराज प्रदिपराव_जाचक,

संयोजक,

छत्रपतीक्रांतीसेना,

उत्तर महाराष्ट्र.

संपर्क – ९५०३११३०२८

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!