मुंबई बनतेय गुन्हेगारांचा अड्डा ! नागरिकांचा जीव धोक्यात.

नवी मुंबई : सरकार मंत्री फक्त सत्ता टिकवण्यात व्यस्त आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असल्याने राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. संकेत भोसले प्रकरणात अजून आरोपी अटक ही झाले नाहीत तोवर नवी मुंबईतील तुर्भे येथील सांमत विद्यालयासमोर काल बुधवारी दुपारी पाच ते सहा अल्पवयीन मुलांच्या गटाने दोन तरुणांना मारहाण केल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
या हाणामारीच्या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी पाच ते सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सदर हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे.
या घटनेतील मृत झालेल्या मुलाचे नाव आदित्य बाबासाहेब भोसले (वय १७) असून जखमी झालेल्या दुसऱ्या मुलाचे नाव देवांग संदिप ठाकूर (वय १७) असं आहे. हे दोघेही तुर्भे गावात राहण्यास असून दोघेही शिक्षण घेत होते. बुधवारी दुपारी हे दोघेही तुर्भे येथील सामंत विद्यालयाजवळ गेले होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या इतर पाच ते सहा मुलांसोबत त्यांची वादावादी झाली. या वादाचे पर्यावसन भांडणात झाल्यानंतर पाच ते सहा मुलांनी आदित्य व देवांग या दोघांना लाथा बुक्क्यांनी, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले. या दोन्ही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडालेला असून लहान लहान मुलांना सुध्धा कायद्याची भीती राहिलेली नाही हेच यावरून लक्षात येते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत