मुख्यपानमुंबई/कोंकणराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम  घेतली हाती

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राइव्ह) हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात धारावीमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर शनिवारी दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. जुहू चौपाटी येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्रकिनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वत: चालवले.

मुंबई महापालिकेने दर आठवड्याच्या शनिवारी प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये होत असलेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १२ या पाच तासांच्या दौऱ्यात ठिकठिकाणी भेट देऊन केली. यावेळी त्यांच्यासोबत शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम, महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!