राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) जाहीर केलेल्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता तर आराखड्यात मनुस्मृतीचा संदर्भ देण्यात आला आहे.-मनिष सुरवसे


(संदर्भ:- दैनिक लोकसत्ता, शुक्रवार, दिनांक 24 मे 2024)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशातील पारंपारिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी या घटकाचा समावेश करण्यात आल्याचे आणि तसेच मूल्ये आणि स्वभाववृत्ति या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यात असल्याचे कारण वरील बातमीमध्ये सांगण्यात आले आहे.
मग आमचे म्हणणे असे आहे की, पारंपरिक आणि प्राचीन ज्ञानाची ओळख करून द्यायची असेल तर भगवद्गीता, मनुस्मृति याच्याही अगोदरचा म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा काळ हा बौद्धकालीन काळ होता, हे अभ्यासातून सिद्ध झालेले आहे.
मग नवीन अभ्यासक्रमात बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि उपदेश का समाविष्ट करण्यात आले नाहीत असा सवाल प्रत्येक सुज्ञ नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही.
दुसरे असे की, ज्या मनुस्मृतीने भारतीय समाजाचे जातीजातींमध्ये विभाजन करून विषमतावादी व्यवस्था निर्माण केली आणि या देशाचे प्रचंड मोठे नुकसान केले ती मनस्मृती मूल्ये कशी काय शिकवते ? माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विषमतावादी मनुस्मृतीला अभ्यासात समाविष्ट करणे म्हणजे, देशामध्ये परत एकदा जात व्यवस्था बळकट करणे आणि देशाला प्रगतीपासून कोसो दूर नेण्यासारखे आहे.
तेव्हा अशा विषमतावादी आणि अमानवीय वृत्ती जोपासणाऱ्या प्राचीन गोष्टींना फाटा मारून नव्या आधुनिक जगाशी नाते जोडणारा अभ्यासक्रम तयार करून अभ्यासात समाविष्ट करावा अशीच मागणी सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे.
????
मनिष सुरवसे
जिल्हाध्यक्ष,
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,
जिल्हा शाखा सोलापूर, सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत