दहावी ,बारावी पास होताय…

_ प्रा.डॉ.दिलीपकुमार कसबे

शिक्षण हे प्रत्येकाला मिळाले पाहिजे.म्हणून शासनाने ही सातवी पर्यंत मोफत शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. आज प्रत्येक पालकाला वाटते माझ्या मुलां मुलींना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे.प्रत्येक पालक आपल्या ऐपती प्रमाणे त्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करत असतात.आपण कोणत्याही जाती धर्मा,पंथाचे ,शिक्षित,अशिक्षित समाजाचे असू पण प्रत्येकाला वाटते जे जे चांगले ते ते आम्हा मिळो.अतिशय चांगली बाब आहे.नक्कीच तसा प्रयत्न केला ही पाहिजे.पण अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालणे अवघड असते.त्यामुळे जे हवे ते मिळेलच असे नाही.तरी सुद्धा जी साधन सामुग्री उपलब्ध असेल त्याच्यामध्ये चांगले शोधलेच पाहिजे.जसे बाजारात लोक सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत भाजीच्या पाटीत,टोपलीत ताजी,चांगली भाजी शोधत असतात.वेचत असतात. मुलाला शाळेत घालायचे मटले की लोक त्यातील तज्ञ असणार्या लोकांचे मार्गदर्शन घेतात. अनेक लोकांना विचारत असतात. नक्की कोणती शाळा चांगली आहे.तसे मटले तर सर्वच शाळा चांगल्या असतात. मग सरकार असो किंवा खाजगी शाळा असो प्रत्येक ठिकाणी शिक्षक,संस्थाचालक आपल्या शाळेचा नावलौकिक वाढण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करत असतात.लोक जातात केवळ जाहिरात बाजीवर.जोखिम मात्र आपणास घ्यावी लागते.असो पण जे चांगले ते जरूर मिळवावे.
जून महिना मटले की सर्वच वर्गांचे रिजल्ट लागलेलेले असतात.लोक केजी पासून पीजी पर्यंत चांगल्या शाळा महाविद्यालयांच्या शोधात असतात. केजी म्हणजे इमारतीचा पाया .पाया भक्कम तर इमारत भक्कम. याप्रमाणे मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतात. मग इंग्रजी शाळा की मराठी अर्थात आपल्या मातृभाषेची शाळा निवडायची.सार्वजनिक ठिकाणी मातृभाषेचे प्रेम दाखवायचे व स्वतःच्या बाबतीत चोरटे धोरण ठेवायचे.आज शाळांचा बाजार झाला आहे. बाजारात जो व्यावसायिक आपला माल खपविण्यासाठी चांगला प्रयत्न करेल त्याचा माल पटकन खपतो. मग ती जाहिरात असो वा शाळा चौकात असो. तसेच जवळच्या वस्तूची किंमत नसते.शाळा,महाविद्यालयांचे ही असेच आहे.जी वस्तू मिळत नाही तीच खरेदी करण्यासाठी लोक प्रयत्न करतात. आपल्या शहरात अजूबाजूला शिक्षणाची चांगली व्यवस्था असली की लोकांना त्याचे महत्व असेलच असे नसते. दुरून डोंगर साजरे दिसतात.तसेच आजकाल झालेले आहे.शाळांचा चकचकीतपणा,वाहतूक व्यवस्था शूज,ड्रेस कोड बैग इ.इंग्रजी शाळेत आपला मुलगा शिकला पाहिजे म्हणून हवी ती फी देऊन लोक प्रवेश मिळवतातच.पण पुढे सर्वच वळणावर सर्वच चालते असे होत नाही.आपला चांगला प्रयत्न असतो.पण शिकणारा महत्वाचा असतो.केवळ प्रत्येक वेळी पैशावर सर्व चालते असे होत नाही.इतर ही काही गोष्टी असणे महत्वाचे असते.पण चांगल्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.
दहावी पास,बारावी पास,झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षित,अशिक्षित दोन्ही पालक हवाल दिल झालेले असतात. त्यातही सुशिक्षित पालक खूप हवाल दिल असतात.नेमका कोठे कोणत्या शाखेला ,कोर्सला प्रवेश घ्यायचा.खरे म्हणजे मुलांना कोणत्याही शाखेला ,कोर्सला जाण्याची संधी हवी होती.पण सध्यातरी ती व्यवस्था आपल्याकडे नाही.अतिशय चांगले गुण आहेत म्हणून सर्वजन यशस्वी होतातच असे नाही.व कमी गुण आहेत म्हणून अयशस्वी होतात असे ही नाही. कमी गुण मिळण्यास अनेक कारणे आहेत. घरची परिस्थिती, अजूबाजूचे वातावरण,पालकांची स्थिती,मिळालेले मित्र आर्थिक स्थिती इ.अलिकडे चांगले ट्युशनवाले कमी मार्क्स मिळालेल्या मुलांना आपल्या ट्युशन मध्ये प्रवेश देतीलच असे नाही. हुशार विद्यार्थ्यांना हुशार बनविण्यात ते आपली चुनूक दाखवितात.पण कमी गुण असणार्यांना दाखवतीलच असे नाही.त्यामुळे हव्या त्या ट्युशन ला प्रवेश मिळेलच असे नाही.त्याची ही इतर कारणे आहेतच.
मुलांना शिकण्यासाठी खूप दालने उपलब्ध आहेत .परंतु ती सर्वांना साधने शक्य होईल असे होत नाही.कारण त्याचे वास्तव्याचे ठिकाण मग,ग्रामीण, शहरी,महानगरीय,त्याचे प्राप्त गुण,आर्थिक अवस्था, पालक शिक्षित, सुशिक्षित, अशिक्षित ,उपलब्ध असणार्या शाळा महाविद्यालये ,प्रवेश संख्या,वेळ माहिती चा अभाव.इत्यादी मुळे काही गोष्टी साध्य करणे ,होणे सहजपणे सांगता येत नाही. कोणाला होईल तर कोणाला नाही.पण प्रयत्न करणे आपल्या हातात आहे.दहावी नंतर कला,विज्ञान,वाणिज्य,इ.शाखांच्यामध्ये दोन वर्षे,अकरावी व बारावी पूर्ण करून पदवी पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेता येते. किंवा दहावी पास झाल्यानंतर तीन वर्षाचे पॉलिटेक्निक मधील कितीतरी,विविध कोर्सेस, हे जेथे असेल तेथे जाऊन नीट माहिती घेऊनच. करावे. हे कोर्स अर्थात डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर बी.ई. ला प्रवेश घेता येईल.तसेच आय.टी आय च्या माध्यमातून दोन वर्षाचे कोर्सेस फीटर कॉम्पुटर ,मेकेनिकल मधून रेडियो, टी.व्ही मोटर व्हिएकल,डिजल,मरिन,इलेक्ट्रिकल,सर्वूअर,प्लम्बर ,मशीन टूल्स,इलेक्ट्रेशियन,वेल्डर,फायरमन,कुकरी,पेंट टेक्नोलॉजी इ.कोर्सेस करू शकता. आरोग्य विभागातील तीन वर्षाचे ही काही कोर्स करता येतात या बाबत मेडिकल कॉलेज शी संपर्क साधून माहिती घेऊन आपण ते करू शकता.इतरमधील फैशन डिझाइन, ब्युटी, कॉस्मेटिलॉजी,ज्वेलरी डिजाईनिंग,फैशन डिजायनिंग,फोटोग्राफी इत्यादी ही उपलब्धतेनुसार करता येऊ शकते. या शिवाय कॉम्प्यूटर शी रिलेटेड सहा महिन्यापर्यंतचे कोर्स आहेत. पण जे करायचे त्या बाबतीत चांगली माहिती घेणे व आपली क्षमता.यावरती हे सर्व अवलंबून आहे.
बारावी पास झालेल्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना नीट .सी.ई.टी. च्या मार्क्स वरून आपल्याला आपले ग्रुप वरून ( पीसीएम,पीसीबी ,किंवा ज्यांचे दोन्ही आहेत असे) चार वर्षे,पाच वर्षे ते तीन वर्षा पर्यंत चे इंजीनियरिंग, डीग्री ,मेडिकल, टेक्नोलॉजी शी संबधित कोर्सना प्रवेश घेऊ शकतात.किंवा आपल्या शाखेप्रमाणे ग्रैज्युएट होऊ शकतात.कला शाखेतील विद्यार्थी बी.ए.एम. ए.,बी.कॉम.एम.कॉम,; बी.एस्सी,एम.एस्सी पर्यंत शिकता येते.प्रथम तीन वर्षापर्यंत,ग्रैज्युएट व पुढे दोन वर्षे पोस्ट ग्रैज्युएट म्हणजे एम.ए.एम.कॉम.एम.एस्सी. करू शकतात. डी.एड ला जाऊन शिक्षक बनू शकतात.यासाठी विद्यार्थी, पालक यांनी सर्वांग विचार करून माहिती घेऊन प्रवेश घ्यावा. मेडिकल साठी जी उपलब्धता आहे.ती नीट पहावी.चांगली माहिती घ्यावी. एम.बी.बी.एस.,बी.ए.एम.एस.,बीएच एम.एस. बी.डी.एस.,नैचरोपैथी, बी.एस्सी अग्री.,बी.व्ही एस.सी .,बी.पी.टी. सायकोथेरपी इ.साठी काही टेस्ट घेतल्या जातात.तर याशिवाय.बी.फार्म,.बी.एस्सी नर्सिंग .,बी.ओ.टी.अक्युपेशन थेरपी., बी.एस्सी लैब टेकनिशियन,बी.एस्सी कार्डिओ,बी.एस्सी आप्टोमेटरी, बी.एस्सी.फिजिसिएन असिस्टंट,.बी.एस्सी.ऑपरेशन थिएटर,बी.एस्सी मेडिशिएन,बी.एस्सी. रेस्पिरिएटरी केअर.बी.एस्सी डी.एम.एल.टी. इत्यादी कोर्सेस करून आर्थिक प्राप्तीचा मार्ग सुकर करू शकतो.
इतर क्षेत्रात ही जाता येते.बी.बी.ए.,बी.सी.ए.,बी.सी.एस., बी.बी.एम.,बी.एफ.एम.,बी.ए.एफ.,बी.एम.एस. इत्यादी.
तर इंजिनिअरिंग च्या क्षेत्रात आय.टी.,सिव्हिल इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग,एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,अग्रीकल्चर इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, अटोमोबाइल इंजिनिअरिंग,सिल्क एन्ड टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, सेरॉमिक इंजिनिअरिंग,इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, एनव्होरमेंटल इंजिनिअरिंग, असे कितीतरी डिग्री कोर्सेस आहेत.विद्यार्थी या माध्यमातून आपले भविष्य उज्वल करू शकतात.परंतु यासाठी जिद्द,चिकाटी व आपल्या ध्येयाकडे अचूक लक्ष हवे.या शिवाय,आर्मी,नेव्ही,एअर फोर्स,फिल्म मेकिंग, डिजाइनिंग, मैनेजमेंट शी संबधित ही पदवी,पोस्ट ग्रैज्युएट होता येते.
कॉमर्स, व कला विभागातून शिक्षण घेणार्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बी.ए.करू इच्छिणाऱे विद्यार्थी बी.ए. लिंग्वेस्टिक्स( मराठी,हिंदी,इंग्रजी, संस्कृत, उर्दू किंवा आपल्या प्रादेशिक भाषा), बी.ए.अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, तत्वज्ञान,भूगोल, राज्यशास्त्र,बी.ए.लायब्ररी सायन्स,बी.ए.फाइन आर्ट्स इत्यादी करू शकतात. एम.ए. तसेच बी.एड,एम.एड. करून टिचिंग च्या क्षेत्रात ही जाऊ शकतात.
बी.कॉम,बी.कॉम.आय.टी.,बी.कॉम.मैनैजमेंट.बी.कॉम.टैक्स प्रोसे.करून नोकरी किंवा व्यवसाय करू शकतात.
एम.ए.,एम.एस्सी,एम.कॉम, कमीत कमी बी.प्लस.मिळवून नेट/ सेट ची परीक्षा पास होऊन सिनियर महविद्यालयात प्रोफेसर ही होता येऊ शकते. जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात. ते विद्यार्थी व जे व्यवसायिक क्षेत्रात जाऊन स्वतःचा व्यवसाय करूभ इच्छितात.अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी.खूप काही करण्यासारखे आहे.परंतु जे काही करणार आहात ते मनःपूर्वक करावे.कारण यामध्ये कमीत कमी दोन, तीन, चार,ते सहा वर्षा पर्यंतचा वेळ द्यावा लागतो. सत्याच्या मार्गावरून चालून चांगले मार्क्स मिळवावेत.म्हणजे आपणास नक्कीच फळ प्राप्त झाल्याशिवाय रहाणार नाही.तेव्हा शैक्षणिक काळात कोठेही विचलित न होता.मधूनच अपूर्ण शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागता शिक्षण पूर्ण करूनच पुढे जावे.मग भविष्यात आपणास कसल्याही प्रकारची अडचण येईल असे वाटत नाही. पालकांनी आपणाकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या आहेत.त्या त्यांच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी,तुमच्या भविष्यातील सुखी जीवनासाठी आहेत.हे लक्षात असू द्या. आपण देशाचे चांगले आधारस्तंभ आहात.आपणातूनच चांगले राजनीतीज्ञ,शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इंजीनियर, डॉक्टर, वकील,भाषावैज्ञानिक, लेखक,कवि,कलाकार,खेळाडू शिक्षक,व्यावसायिक, प्रशासक, जन्म घेणार आहेत. त्यातूनच देशाचा नावलौकिक वाढणार आहे देश प्रगती पथावर जाणार आहे.म्हणून जे शिक्षण तुमच्या वाट्याला येईल ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करावे,नावलौकिक मिळवावा. हीच प्रार्थना आहे.फळ नक्कीच मिळेल.
_ प्रा.डॉ.दिलीपकुमार कसबे
कराड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत