महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघा च्या वतीने आयु. हारून अत्तार साहेबांचा सत्कार.

राज्याचे शिक्षण सहसंचालक तथा राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय हारून आतार साहेब यांचा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्याहस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण आयुक्तालयातील अधिकारी मा कृष्णा ढाळेसाहेब, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील अधीक्षक मा प्रविण गायकवाड साहेब, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, जिल्हा खजिनदार दाऊत आतार, पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय साळवे , प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा अभिजित भंडारे, वंदना वाजे( पुणे ),अशोक मोहरे, इत्यादी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. यावेळी अभिजित भंडारे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयीन अनेक शिक्षकांचे त्रुटी पुर्ततेचे शालार्थ आय डी चे प्रश्न मार्गी लावले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत